बापू कुटीच्या आदिनिवासात दिला होता 'चले जाव' चा नारा 

महात्मा गांधी यांच्यासोबत कस्तुरबा गांधी, महादेवभाई होते. यावेळी महात्मा गाधींना अटक होईल अथवा नाही याबाबत चर्चा सुरू होती. झालेही तसेच दुसऱ्या दिवशी अखेर महात्मा गांधी यांच्या नावे अजब पद्धतीने वॉरंट आला आणि त्यांना अटक झाली. पण तोपर्यंत चले जाव आणि भारत छोडो, हे आंदोलन अख्या देशभर पसरलं होतं.
Bapu Kuti Wardha
Bapu Kuti Wardha

वर्धा : 'इंग्रजांनो चालते व्हा' हा महात्मा गांधी यांनी दिलेला नारा कोणताही भारतीय विसरू शकत नाही. देशात झालेल्या या आंदोलनाची मूळ रूपरेषा ठरली ती वर्ध्यातील सेवाग्रामच्या आश्रमात. यावेळी ब्रिटिशांच्या विरोधात जपान आणि सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेला भारतीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन सुभाषचंद्र बोस यांनी केले होते. ‘चले जाव’च्या नाऱ्यानुसार आंदोलन करण्याची तारीख ८ आॅगस्ट ही ठरली होती. 

त्याच काळात स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या सेवाग्राम येथील आश्रमाच्या आदिनिवासात महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई यांच्यासह अनेक बड्या स्वातंत्र सैनिकांची यांची बैठक झाली. ब्रिटिशांना येथून हाकलण्यासाठी हा काळ योग्य असल्याचे म्हणत या बैठकीत 'चले जाव'चा नारा देण्यात आला. या नाऱ्यानुसार आंदोलन करण्याची तारीख आठ ऑगस्ट ठरली. या तारखेला महात्मा गांधी मुंबईला जाणार होते. आठ तारखेला मुंबई गाठण्यासाठी महात्मा गाधीं दोन दिवसांपूर्वी निघाले. निघण्यापूर्वी त्यांनी वर्ध्यातील लक्ष्मीनाराण मंदिरात दर्शन घेतले. येथून थेट रेल्वेस्थानकावर जात त्यांनी मुंबई गाठली. हा त्यांचा वर्ध्यातील वास्तव्याचा शेवटचा दिवस ठरल्याचे आश्रम प्रतिष्ठानचे जालंधरभाई यांनी सांगितले. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे, अशा सूचना महात्मा गांधी यांनी दिल्या होत्या. या काळापर्यंत महायुद्ध भारताच्या दारावर येऊन पोहोचले होते. 

महायुद्धाचा काळ, ब्रिटीशांविरोधात असलेला रोष आणि महात्मा गांधी यांनी दिलेला इशारा यामुळे देश पेटून उठला होता. याच काळात महात्मा गांधी मुंबईत पोहोचले. यात 8 ऑगस्टला मुंबईच्या गवालिया टॅंकवर कॉंग्रेसचे महाअधिवेशन भरले. त्यात इंग्रजांनी भारतातून चालते व्हावे, असा ठराव पारीत करण्यात आला. यावेळी महात्मा गांधी यांनी त्यांच्या भाषणात आता प्रत्यक्ष कृतीची वेळ आली आहे, असे संबोधित केले. या क्षणापासून 'आपण कुणाचे गुलाम नाही, स्वतंत्र झालो' असे वागण्याचा सल्ला त्यांनी दिला. शिवाय 'करू किंवा मरू' हा मंत्र प्रत्येकाने आपल्या हृदयावर कोरून ठेवण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. त्या रात्री सर्व साथीदारांचा मुक्‍काम बिरला हाउसमध्ये होता. यावेळी महात्मा गांधी यांच्यासोबत कस्तुरबा गांधी, महादेवभाई होते. यावेळी महात्मा गाधींना अटक होईल अथवा नाही याबाबत चर्चा सुरू होती. झालेही तसेच दुसऱ्या दिवशी अखेर महात्मा गांधी यांच्या नावे अजब पद्धतीने वॉरंट आला आणि त्यांना अटक झाली. पण तोपर्यंत चले जाव आणि भारत छोडो, हे आंदोलन अख्या देशभर पसरलं होतं.     (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com