bad beer will go into the customers stomach | Sarkarnama

...तर खराब बीअर जाणार ग्राहकांच्या पोटात ! 

सरकारनामा ब्युरो 
शुक्रवार, 22 मे 2020

राज्य सरकारने कर्नाटक राज्याच्या धर्तीवर घरपोच दारू विक्रीला परवानगी दिली. बारमध्ये असलेला 24 मार्च पुर्वीचाच साठ्याची विक्री करण्याला परवानगी दिली आहे. बिअरची विक्री निश्‍चित मुदतीत झाली नाही, तर ती खराब होते.

नागपूर : दारू विक्रीला परवानगी देण्यात आली असली तरी बार बंद आहेत. या बारमध्ये लाखो लिटर दारू व बीअर पडून आहे. या बिअरची मुदत संपण्यात जमा असल्याचे सांगण्यात येते. गृह विभागाने बारमधील साठा विकण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या बिअरची विक्री होण्याचा मार्ग मोकळा झाला. पण विक्रेत्यांकडून सर्वच बिअरची विक्री होण्याची पूर्ण शक्‍यता आहे. याची तपासणी करण्याची यंत्रणा नसल्याने मुदतबाह्य (खराब) बीअर लोक पितील. त्यामुळे जिवाला धोका होण्याची दाट शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

राज्य सरकारने कर्नाटक राज्याच्या धर्तीवर घरपोच दारू विक्रीला परवानगी दिली. बारमध्ये असलेला 24 मार्च पुर्वीचाच साठ्याची विक्री करण्याला परवानगी दिली आहे. बिअरची विक्री निश्‍चित मुदतीत झाली नाही, तर ती खराब होते. बारमध्ये लाखो लिटर बिअर असून ती खराब होण्याच्या मार्गावर आहे. बीअर खराब झाल्याच बार चालकांचे मोठे नुकसान होईल. 

हे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने बिअर बारमधील बीअर विक्रीस परवानगी दिल्याची माहीती आहे. हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात आहे. नागपूर जिल्ह्यात 100 वर बार असून प्रत्येकाकडे शेकडो पेट्यांचा साठा शिल्लक आहे. मुदतबाह्य बीअर नष्ट करणे किंवा बाहेर ठेवण्याची यंत्रणा विभागाकडे तोकडी आहे. फायद्यासाठी मुदतबाह्य बिअरची विक्री होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख