बी.आर. घाडगे यांची उद्या राज्य गुन्हे अन्वेषण विभाग करणार चौकशी… - b r ghadge to be quentioned by state criminal investigaion department tomorrow | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

बी.आर. घाडगे यांची उद्या राज्य गुन्हे अन्वेषण विभाग करणार चौकशी…

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 18 मे 2021

बी. आर. घाडगे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांची चौकशी करणे अनिवार्य असल्याचे राज्ये गुन्हे अन्वेषण विभागाने म्हटले आहे.

नागपूर : अकोला पोलिस नियंत्रण कक्षात Akola police control room कार्यरत पोलिस निरीक्षक Police Inspector यांनी परमबीर सिंह Parambir Singh प्रकरणात राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यासंदर्भात घाडगे यांची चौकशी करायची असल्याने त्यांना उद्या १९ मे रोजी सकाळी ११ वाजता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या Tomorrow, May 19, at 11 a.m. at the State Criminal Investigation Department मुंबई कार्यालयात बोलावण्यात आले आहे. तसे पत्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने अकोल्याच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाठवले आहे. यापूर्वी परमबीर सिंह खंडणी प्रकरणी सोनू आणि केतनची सीआयडीने साडेतीन तास चौकशी केली होती. Sonu and Ketan were interrogated by the CID for three and a half hours

बी. आर. घाडगे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांची चौकशी करणे अनिवार्य असल्याचे राज्ये गुन्हे अन्वेषण विभागाने म्हटले आहे. यापूर्वी कोट्यवधी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोप झालेल्या मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधातील तक्रारीवरून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) सोनू जलान आणि केतन तन्ना यांची तब्बल साडे तीन तास कसून चौकशी केली होती. यावेळी सोनू जलान आणि केतन तन्ना यांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात काही कागदपत्रे सीआयडीकडे सादर केली आहेत. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

परमबीर सिंग यांच्या विरोधात सोनू जलान, केतन तन्ना आणि मुनीर पठाण यांनी केलेल्या तक्रारी वरून राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे वर्ग केले आहे. त्यानुसार सीआयडीने सोनू जलान, केतन तन्ना आणि मुनीर पठाण यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार सोनू जलान आणि केतन तन्ना हे सीआयडीच्या नवी मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले. सीआयडीने दोघांकडेही त्यांनी केलेल्या आरोपांबाबत तब्बल साडेतीन तास उलट सुलट कसून चौकशी केली. यावेळी या दोघांनीही सीआयडीला पुरावे म्हणून काही कागदपत्रे दिली आहेत. सीआयडी आता या दोघांनी दिलेली माहिती आणि कागदपत्रे तपासत आहे. त्यामुळेच सीआयडीने सोनू जलान आणि केतन तन्ना या दोघांनाही शुक्रवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. 

ठाणे शहर पोलीस दलात आयुक्त असताना परमबीर सिंग यांनी खंडणी उकळण्यासाठी आजी-माजी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांसह दलालांचे एक रॅकेट तयार केले होते. याच रॅकेटच्या माध्यमातून परमबीर सिंग यांनी कोट्यवधी रुपयांची माया जमवल्याचा आरोप राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्‍यांनी केला आहे. परमबीर सिंग यांच्या विरोधात पोलीस अधिकाऱ्‍यांनी आवाज उठवल्याने आता सिंह यांनी पैसे उकळण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करून अटक केलेल्या व्यक्तींनीही त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत.

काय आहेत आरोप ?
ठाणे पोलिसांनी खोट्या अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर आपल्यावर क्रिकेट बेटिंगचाही खोटा गुन्हा दाखल केला. त्यानंतर परमबीर सिंग यांनी मकोका लावून आपल्याला आणि कुटुंबाला धमकावून तब्बल ३ कोटी ४५ लाख रुपये वसूल केले. यात सिंग यांच्यासह ठाणे पोलीस दलातील खंडणी विरोधी पथकाचे तत्कालीन पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथमिरे यांचा समावेश होता, असे गंभीर आरोप सोनू जलान याने आरोप केले आहेत.

केतन तन्ना यांनीही परमबीर सिंग यांच्यावर खंडणी वसूल केल्याचा आरोप करत आपल्याकडून १ कोटी २५ लाख रुपये उकळल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी सिंग यांच्यासह अन्य अधिकाऱ्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. आम्ही दोषी आढळलो तर, आमच्यावर कारवाई करा, पण आम्हाला न्याय द्या, अशी मागणी केली आहे. तसेच, मुनीर पठाण यांनीही आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आणि परमबीर सिंग यांच्या ठाणे पोलीस आयुक्तालयात चालणाऱ्‍या खंडणी उकळण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश करून कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा : गंगेत मृतदेह : मानवाधिकार आयोगाच्या नोटिशीनंतर मुख्यमंत्री योगींना साक्षात्कार

यूएलसी घोटाळयातही ५० कोटींची वसुली केल्याचा आरोप 
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या गैरकारभाराबाबत  
तक्रारीचा ओघ कायम असून मौजे भाईंदरमधील यूएलसी घोटाळ्याच्या तपासातून त्यांनी अन्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ५० कोटीहून अधिक रक्कम वसूल केल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक राजेश शहा यांनी यापूर्वी केलेला आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख