ऑडीओ क्‍लीपने उघड केले महापौरांना "हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचे कारस्थान 

डॉ. गंटावारांना निलंबित करण्याचे आदेश सभागृहात दिले होते. कारण नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी सभागृहात त्यांच्याविरोधाती पुरावे सादर केले होते. त्यानंतरही त्यांना आजपर्यंत वाचविण्यातच येत आहे. या ऑडीओ क्‍लिपमधून जे उजागर झाले, त्यामागे डॉ. गंटावार प्रकरण कारणीभूत असण्याचीही शंक्‍यता आहे.
Sandip Joshi
Sandip Joshi

नागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौर संदीप जोशी यांच्यातील वाद राज्यभर गाजत आहे. पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. गंटावार यांच्या निलंबनावरुन आयुक्त आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. हा वाद आता भलत्याच वळणावर येऊन पोचला आहे. नुकत्याचे "आऊट' झालेल्या एका ऑडीओ क्‍लीपमध्ये मला आणि ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना हनी ट्रॅपमध्ये फसवण्याबाबतचे संभाषण असल्याचे महापौर जोशी यांनी आज "सरकारनामा'ला सांगितले. प्रशासनातले अधिकारी अशा गलीच्छ पद्धतीचे राजकारण करत असतील, तर ते फार भयानक असल्याचेही जोशी म्हणाले. 

साहील सैय्यद नामक व्यक्ती त्याच्या माणसाला उपरोक्त विषयासंदर्भात माहिती देत आहे. मी दयाशंकर तिवारी यांना समोर करतो आहे आणि ते प्रशासनातील अधिकाऱ्यांवर आरोप करताहेत, असा उल्लेख त्या ऑडीओ क्‍लीपमध्ये आहे. या क्‍लीपमध्ये जे बोलत आहेत, ते साहील सैय्यत पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. गंटावार यांच्यासोबत ऍलेक्‍सीस हॉस्पीटलमध्ये धाड टाकत असतानाची त्यांचीही एक व्हिडीओ क्‍लीप बाहेर आल्याचेही जोशींनी सांगितले. नागपुरात यापूर्वीही राजकारण होत आलं आहे. पण प्रशासकीय व्यक्ती अशा प्रकारची कामे करुन शहरात गलीच्छ, घाणेरडं वातावरण तयार करण्याचे प्रयत्न करीत असतील तर आमच्यासकट संपूर्ण नागपुरकरांसाठी हा शरमेचा विषय आहे. असं कधी होऊ नये, यासाठी आम्ही सर्व एकत्रितपणे प्रयत्न करीत असतो. पण प्रशासनातले अधिकारी जर असं करत असतील, तर ते अत्यंत वाईट आहे. या प्रकाराची तक्रार आम्ही करणार आहोत. 

डॉ. गंटावारांना निलंबित करण्याचे आदेश सभागृहात दिले होते. कारण नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी सभागृहात त्यांच्याविरोधाती पुरावे सादर केले होते. त्यानंतरही त्यांना आजपर्यंत वाचविण्यातच येत आहे. या ऑडीओ क्‍लिपमधून जे उजागर झाले, त्यामागे डॉ. गंटावार प्रकरण कारणीभूत असण्याचीही शंक्‍यता आहे. या कारस्थानामागे आयुक्त आहेत का, असा प्रश्‍न विचारला असता, महापौर म्हणाले की त्या क्‍लीपमध्ये बरीच नावे घेण्यात आली आहे. त्यामुळे यामागे नेमकं कोण आहे, हे सांगणं योग्य होणार नाही. आम्ही तक्रार करणार आहोत. त्यानंतर पोलीसांच्या कारवाईत सत्य काय ते पुढे येईल. कारण पोलीसांवर आमचा पूर्ण विश्‍वास आहे, असे महापौर जोशी यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com