ऑडिओ क्लिप झाली व्हायरल आणि धमकावणाऱ्यांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश...

तुमचे बोलणे खासदार मॅडमशी करून देतो, त्यानंतर वाटल्यास खुशाल काम सुरू ठेवा, असेही ठेकेदाराला सांगितले जाते. लक्षात ठेवा, तुम्ही बोगस कामे करीत आहात. आधी ‘ताईसाहेबांशी’ बोलून घ्या.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

नागपूर : महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाची सुरू असलेली कामे बंद करण्याबाबत शिवसैनिक ठेकेदाराला धमकावतात. याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Union Minister Nitin Gadkari यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांना पत्र लिहिले. शिवसैनिकांनी केवळ ठेकेदाराला धमकावलेच नाही, तर वाहनांची तोडफोडही केली. त्यानंतर आता एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते आहे. ही क्लिप जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असलेले शिवसैनिक महादेव ठाकरे Mahadev Thakre ठेकेदाराला धमकावतानाची असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान धमकावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस महासंचालकांना दिले असल्याची माहिती प्राप्त होत आहे. 

यासंदर्भात नितीन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यापुढे महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची कामे करायची की कसे?, असा प्रश्‍न विचारणारे पत्र पाठवले आहे. ते पत्र माध्यमांमधून पुढे आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी धमकावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना दिले असल्याची माहिती प्राप्त होत आहे. ठेकेदाराला धमकावणारे रिसोडचे तालुकाप्रमुख महादेव ठाकरे आणि वाशीमचे तालुकाप्रमुख रामदास मते, हे दोघे जण असल्याचेही सांगण्यात येत आहे. ठेकेदाराला धमकावताना त्यांनी तुम्ही ऐकत नसाल, तर खासदारांना सांगतो, असे म्हटल्याचाही उल्लेख आहे. 

काय आहे क्लिपमध्ये ?
या क्लिपमध्ये धमकावणारा ठेकेदाराला रस्त्याचे काम थांबविण्यासाठी सांगत आहे. मागच्या वर्षी केलेल्या रस्त्याच्या कामाचे याच वर्षी डागडुजी करण्याची वेळ का आली, असेही विचारतो. त्यानंतर जोपर्यंत चौकशी होत नाही, तो पर्यंत काम थांबवा, असे सांगतो. त्यानंतर किनवटजवळचा रस्ता खराब झाल्याचे ठेकेदाराला सुनावले जात आहे. त्यावर ठेकेदार म्हणतात की ही बाब तुम्ही एनएचएआयच्या अधिकाऱ्यांशी बोलून घ्या. त्यांनी सांगितल्यास किंवा आम्हाला नोटीस दिल्यास आम्ही तात्काळ काम थांबवू. त्यानंतर धमकावणारा म्हणतो की एकदम कायदे आणि नियमांवर जाऊ नका. 

ठेकेदार म्हणतो की, मी देवगावला आहे. तुम्ही येथे येऊ नका. एक तासात मीच तिकडे येतो. तरीही एक तास काम बंद ठेवा, आम्ही तुमच्या कामावर आहो, असे ठेकेदाराला धमकावले जाते. तुमचे बोलणे खासदार मॅडमशी करून देतो, त्यानंतर वाटल्यास खुशाल काम सुरू ठेवा, असेही ठेकेदाराला सांगितले जाते. लक्षात ठेवा, तुम्ही बोगस कामे करीत आहात. आधी ‘ताईसाहेबांशी’ बोलून घ्या, अन् मग काम सुरू करा. कारण हा आमच्या आमच्या जीवनमरणाचा प्रश्‍न आहे. असे धमकावणारा ठेकेदाराला सांगतो. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com