आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे कॉंग्रेस-राष्ट्रवादीला कंटाळले असावे...

मी फडणवीस यांना भेटणार असून त्यांना पण हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मला अजूनही असे वाटते की, शिवसेना या सरकारमधून बाहेर पडेल.
Ramdas Athavale
Ramdas Athavale

नागपूर : शिवसेनेचे प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Shiv Sena chief and the Chief Minister Uddhav Thackeray यांनी काल औरंगाबाद येथे भारतीय जनता पक्षाच्या अपेक्षा उंचावतील, असे वक्तव्य केले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विविध चर्चा सुरू झाल्या. अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. उद्धव ठाकरे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला कंटाळले असावे, Fed up with congress and ncp  त्यामुळे कदाचित पुन्हा त्यांची इच्छा भाजपसोबत येण्याची असावी, असे रिपाइंचे (आठवले गट) रामदास आठवले म्हणाले. Ramdas Athavale. 

शिवसेना आणि भाजपने एकत्र यावे, हे मी आधीपासूनच म्हणत आलो आहे. युतीची सरकार जर बनली तर ते महाराष्ट्राच्या हिताचे असणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत राहून शिवसेनेला फायदा नाहीच. त्यांनी भाजप सोबत येऊन सरकार बनवले पाहिजे. काल उद्धव ठाकरे यांनी हळूच का होईना, पण संकेत दिले आहेत. त्यानंतर राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते, अशा प्रतिक्रिया जवळपास सर्वच पक्षांच्या नेत्यांनी दिल्या. 

या दोन्ही पक्षाने एकत्रित येऊन सरकार स्थापन केल्यास महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल. नाहीतरी राज्य सरकार प्रत्येक अपयशासाठी केंद्राकडे बोट दाखवते. सेना-भाजपचे सरकार आल्यास किमान हा प्रकार तरी बंद होईल आणि केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्याचा फायदा शेवटी महाराष्ट्रालाच होणार आहे. त्यामुळे त्यांचे एकत्र येण्याने राज्याचे भले होणार आहे. हा विचार दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी करावा. सोबत बसून चर्चा करावी आणि मार्ग काढावा, असे रामदास आठवले यांनी नमूद केले. 

शिवसेनेत असे अनेक आमदार आहेत की, ज्यांना भाजपसोबत गेले पाहिजे, असे वाटते. म्हणून आता उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा. भाजपमध्ये त्यांचे स्वागत होईल. अजूनही वेळ गेलेली नाही भाजपच्या नेत्यांनी सुद्धा पुढाकार घ्यावा. मी फडणवीस यांना भेटणार असून त्यांना पण हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मला अजूनही असे वाटते की, शिवसेना या सरकारमधून बाहेर पडेल आणि महाराष्ट्रात नवीन सरकार बनेल, असा विश्‍वास आठवले यांनी व्यक्त केला. नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद मिटला पाहिजे, असेही ते म्हणाले. 

सचिन वाझे जेवढा पैसा गोळा करीत होते, तो परिवहन मंत्री अनिल परब आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना देत होते. याबाबत बोलताना आठवले म्हणाले, ईडी, एनआयए वाझेचा तपास करीत आहेत. तपास यंत्रणांच्या तपासात दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली पाहिजे. आतंकवादी हल्ल्याचा कट नुकताच हाणून पाडण्यात आला आहे. हिंदू असो वा मुसलमान किंवा कोणत्याही धर्माच्या लोकांवर आतंकवादी हल्ला होऊ नये, यासाठी सरकार डोळ्यात तेल घालून काम करीत आहे. यातील दोषींना कठोर शासन होईल आणि यापुढेही आतंकी हल्ल्याचे प्रयत्न हाणून पाडण्यात येतील, असे रामदास आठवले म्हणाले.   
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com