अशोक चव्हाणांना टिका करण्याची सवयच लागली आहे : देवेंद्र फडणवीस - ashok chavan has become accustomed to criticism said devendra fadanvis | Politics Marathi News - Sarkarnama

अशोक चव्हाणांना टिका करण्याची सवयच लागली आहे : देवेंद्र फडणवीस

सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 15 मे 2021

मराठा आरक्षणाच्या मुद्द्य़ावरून विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण तसेच महाविकास आघाडीला चांगलेच दारेवर धरले.

नागपूर : न्यायाधीशांनी घटना दुरुस्तीनंतरही राज्याचे अधिकार अबाधित राहणार (Even after the amendment, the rights of the state will remain unaffected) असल्याचे मत मांडले; तर तीन न्यायाधीशांनी एखाद्या वर्गाला मागास ठरवण्याचा अधिकार केंद्राचा असल्याचे (To be of the center of authority) स्पष्ट नमूद केले होते. हे सर्व अधिकार राज्यांचेच असल्याचे सांगण्यासाठी केंद्राने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे आभार मानायला पाहिजे. मात्र अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना टीकेची सवयच लागली आहे, अशी टिका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली.

राज्य सरकारने उठसूठ केंद्राकडे बोट दाखवणे थांबवावे. सर्व केंद्रालाच करायचे असेल; तर महाविकास आघाडीला फक्त माश्या मारायच्या आहेत का, असा सणसणीत टोलाही फडणवीस यांनी लगावला. नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्य़ावरून विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण तसेच महाविकास आघाडीला चांगलेच दारेवर धरले. १०२ व्या घटना दुरुस्तीत राज्यांचे अधिकार अबाधित ठेवण्यात आल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने तत्काळ कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करून आपले म्हणणे मांडले. न्यायाधीशांनी घटना दुरुस्तीनंतरही राज्याचे अधिकार अबाधित राहणार असल्याचे मत मांडले; तर तीन न्यायाधीशांनी एखाद्या वर्गाला मागास ठरवण्याचा अधिकार केंद्राचा असल्याचे नमूद केले होते. 

हे सर्व अधिकार राज्यांचेच असल्याचे सांगण्यासाठी केंद्राने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे आभार मानायला पाहिजे. मात्र अशोक चव्हाण यांना टीकेची सवयच लागली आहे. मराठा आरक्षण टिकवता आले नसल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. त्यांना काही समजेनासे झाले असल्याने सर्वकाही केंद्रावर टाकून आपली जबाबदारी झटकण्याचा ते प्रयत्न करीत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

हेही वाचा : हात-पाय बांधून तलवार दिली तर लढणार कसे?

राज्यपालांना भेटण्याची नौटंकी 
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळून लावले आहे. राज्यपालांच्या हाती काही शिल्लक नाही. याकरिता न्यायालयीनच लढा लढावा लागणार आहे. सर्वप्रथम राज्याला मागास वर्ग आयोगाची स्थापना करावी लागेल. त्या आयोगाला मराठा समाज मागास यांची कारणे नव्याने द्यावी लागतील. हे माहीत असतानाही राज्यपालांची भेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी घेतली. ही सर्व नौटंकी असल्याचे फडणवीस म्हणाले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख