आशिष देशमुख शेजारी येऊन बसले आणि सुनील केदारांचा भडका उडाला...

याद राखा मला विचारल्या, सांगितल्याशिवाय कुण्याही ऐऱ्यागैऱ्याला बोलावले तर.’, असे म्हणत केदारांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
आशिष देशमुख शेजारी येऊन बसले आणि सुनील केदारांचा भडका उडाला...
Sunil Kedar - Ashish Deshmukh

नागपूर : काटोलचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख Former MLA of katol Dr. Ashish Deshmukh यांनी काल मुख्यमंत्र्यांना The Chief Minister पत्र लिहून राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार Anmil and Husbandry Minister Sunil Kedar यांना मंत्रिपदावरून बरखास्त करण्याची मागणी केली. ते पत्र त्यांनी सोशल मिडियावर टाकताच राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली. पण एकाएकी डॉ. देशमुखांनी येवढा आक्रमक पवित्रा घेतला कसा, याचे उत्तर मात्र भल्याभल्यांना सापडले नाही. आता येथे जाणून घेऊया ‘त्या’ पत्रामागचे खरे कारण...

यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. आशिष देशमुख आमदार राहिलेल्या काटोल आणि नरखेड तालुक्यांत सुनील केदार यांनी शनिवारी आढावा बैठका घेतल्या. त्या बैठकांसाठी डॉ. देशमुख यांना निमंत्रण नव्हते. तरीही ते काटोलच्या आढावा बैठकीला पोहोचले आणि थेट मंचावर जाऊन मंत्री सुनील केदार यांच्या बाजूला जाऊन बसले. हे बघून केदार आश्चर्यचकित आणि क्रोधीतही झाले. ‘तुम्ही येथे कसे काय आले, तुम्हाला कुणी बोलावले?’, असे केदारांनी विचारले. त्यावर ‘मी माजी आमदार आहे, माझा अधिकार आहे आढावा बैठकीमध्ये येण्याचा आणि अधिकाऱ्यांनी मला बोलावले आहे.’, असे उत्तर देशमुखांनी दिले. 

डॉ. देशमुखांचे उत्तर ऐकून मंत्री केदाराचा पारा चांगलाच भडकला आणि ते अधिकाऱ्यांवर खवळले. ‘तुम्हाला कळत नाही का, बैठकीला कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही. याच्यापुढे याद राखा मला विचारल्या, सांगितल्याशिवाय कुण्याही ऐऱ्यागैऱ्याला बोलावले तर.’, असे म्हणत केदारांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. त्यानंतर तेथील वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले होते. अधिकारीही चिडीचुप्प झाले आणि तशाच वातावरणात बैठक पार पडली. येथे सुनील केदार यांनी आशिष देशमुखांचा चांगलाच पाणउतारा केल्याचे बैठकीला हजर असलेल्या काही जणांनी सांगितले. 

त्यानंतरही आशिष देशमुख नरखेड येथील आढावा बैठकीला पोहोचले. मात्र येथे ते मंचावर गेले नाही तर जनतेसाठी मंचासमोर ज्या खुर्च्या ठेवल्या होत्या, तेथे पहिल्या रांगेत बसले. येथे मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. बैठक सुरळीत आटोपल्याचे सूत्र सांगतात. पण आशिष देशमुखांचा अपमान झाला होता. त्यामुळे ते चांगलेच खवळलेले होते. तेथून निघाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी देशमुखांनी मंत्री केदारांचे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे २० वर्षापूर्वीचे प्रकरण उखरून काढले आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केदारांना बरखास्त करण्याची मागणी केली. 

का केला बातमीसाठी फोन ?
सामान्यपणे मंत्री सुनील केदार नेहमी पत्रकार परिषदा वगैरे घेत नाहीत. मात्र शनिवारी आढावा बैठका झाल्यानंतर त्यांच्या कार्यालयातून बैठकीची बातमी घ्यावी, असे कॉल काही माध्यम प्रतिनिधींना आले होते. त्यामागचे कारण तेव्हा कुणालाच कळले नाही. पण शोध घेतला असता, वरील माहिती मिळाली. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in