अनुष्का शर्माला नागपूर पोलीसांनी विचारला प्रश्‍न, काय होता हा प्रश्‍न ? 

लॉकडाउन काळात त्यांच्या मुंबईच्या घरात राहत असलेले विराट कोहली व अनुष्का शर्मा दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. विविध प्रकारे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. विशेष म्हणजे या स्टार जोडीला चाहत्यांकडूनही भरपूर प्रतिसाद मिळतो.
Virat Kolhi
Virat Kolhi

नागपूर : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा ही जोडी कायमच चर्चेत असते. नुकताच अनुष्का शर्माने सोशल मीडिया अकाऊंटवर, "I spotted &. A Dinosaur on the loose" असे कॅप्शन देत विराटचा डायनॉसोर स्टाईलमध्ये चालताना व्हिडीओ पोस्ट केला. या पोस्टला थेट नागपूर पोलिसांनी प्रतिसाद दिला आहे. "मदतीसाठी वन विभागाला पाठवू का ?" असा विनोदी प्रश्न अनुष्काला नागपूर पोलिसांनी विचारला आहे. 

लॉकडाउन काळात त्यांच्या मुंबईच्या घरात राहत असलेले विराट कोहली व अनुष्का शर्मा दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. विविध प्रकारे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. विशेष म्हणजे या स्टार जोडीला चाहत्यांकडूनही भरपूर प्रतिसाद मिळतो. विराट कोहलीचा असाच एक डायनासॉरच्या पोझ मधला फोटो अनुष्का शर्माने ट्विट केला इतकेच नव्हे तर मी आत्ताच एक डायनोसॉर बघितला आहे, असे कॅप्शनदेखील तिने फोटोला दिले. या पोस्टला उत्तर देत नागपूर शहर पोलिसांनी वन विभागाला पाठवायचे का? असा विनोदी प्रश्न अनुष्काला विचारला आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या युद्धात अहोरात्र झटणाऱ्या नागपूर शहर पोलिसांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. 

सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्याचे काम करणाऱ्या पोलिस विभागातील प्रत्येकाच्या डोक्‍यावर कामाचा ताण आहे. तरीही प्रसंगावधान साधून नागपूर शहर पोलिसांनी विचारलेल्या या विनोदी प्रश्नाला विराट-अनुष्काच्या चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असलेला विराट कोहली कायमच जगभ्रमंती वर असतो अभिनयाच्या क्षेत्रात दमदार कामगिरी गाजविणारी अनुष्का शर्मा देखील विविध चित्रीकरणाच्या शेड्यूलमध्ये व्यस्त असते. लॉक डाऊन असल्याने दोघेही घरी एकत्र असल्याने हा काळ अतिशय आनंदाने ते साजरा करीत आहेत. नुकताच एक मे रोजी अनुष्का शर्मा चा वाढदिवस देखील दोघांनी जल्लोषात साजरा केला व त्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com