पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार संतापले, अन् पोलिसांना घेतले फैलावर... - animal husbandry minister sunil kedar become angry and over the spread the police | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार संतापले, अन् पोलिसांना घेतले फैलावर...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 23 ऑगस्ट 2021

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव हेमके यांनी कोणताही पाठपुरावा केला नाही. तक्रार गायब असताना त्यांनी दुसरी प्रत दिली नाही.

नागपूर : जिल्हा परिषदेकडून पोलिस ठाण्यात करण्यात आलेल्या तक्रारी गायब झाल्या. या प्रकारामुळे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार Animal husbandry minister sunil kedar चांगलेच संतापले. पोलिस काय काम करतात, असा सवाल उपस्थित करत त्यांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. या प्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 

सुरक्षा ठेव घोटाळ्यात जिल्हा परिषदेच्यावतीने तीन तक्रारी करण्यात आल्या. यातील एका तक्रारीवर गुन्हा दाखल झाला. पाणी पुरवठा विभागाची तक्रार पोलिस ठाण्यातून गायब असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यापूर्वी लघुसिंचन विभागाने केलेली तक्रारही गायब झाली होती. पोलिस ठाण्यातून तक्रार गायब होत असल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शंका व्यक्त करीत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी पोलिस विभागाला फैलावर घेतले व कारवाईचे निर्देश दिले. 

ही बातमी वाचा ः १४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा? चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट सवाल…

सुरक्षा ठेव घोटाळ्यामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा डागाळत आहे. याप्रकरणी मंत्री केदारांनी काल रविभवन येथे बैठक आयोजित केली़  
होती. बैठकीला अध्यक्षा रश्मी बर्वे, माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सीईओ योगेश कुंभेजकर, अतिरिक्त सीईओ डॉ. कमलकिशोर फुटाणे, कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर, संजीव हेमके, रमेश गुप्ता, डीसीपी विनिता शाहू, सदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चौधरी, सुरक्षा ठेव घोटाळ्याचे तपास अधिकारी महिपाळे उपस्थित होते. 

ही बातमी पण वाचा ः ‘गंगाजमुना’वरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आपसात भिडले, झाला मोठा राडा...

सुरक्षा ठेव घोटाळ्यातील कंत्राटदार आरोपीवर कारवाई होत नसून जिल्हा परिषदेत त्याचा मुक्त संचार असल्याच्या प्रकारावर पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी नाराजी व्यक्त करीत पोलिस व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. आरोपीला जामीन नसताना त्याचा जिल्हा परिषदेसह इतर ठिकाणचा वावर लाजिरवाणा असल्याचे ते म्हणाले. एखाद्या आरोपीला अशा प्रकारे अभय देणे खपवून घेतले जाणार नाही. यावर डीसीपी शाहू यांनी आपण याप्रकरणी लक्ष घालून आरोपीला तत्काळ अटक करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 

हेमकेंची होणार उचलबांगडी 
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव हेमके यांनी कोणताही पाठपुरावा केला नाही. तक्रार गायब असताना त्यांनी दुसरी प्रत दिली नाही. काही ठिकाणी नळ योजनेचे काम पूर्ण होण्यापूर्वीच ग्रामपंचायतींना हस्तांतरित करून हेमके यांनी कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचे काम केले. हेमके यांच्या कार्यप्रणालीवर केदार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांची उचलबांगडी होणार शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख