संतप्त शिवसैनिक म्हणाले, बेताल गोस्वामीच्या मुसक्या आवळा !

अर्णब रिपब्लिकन वाहिनीवरच्या चर्चेत सुशांत राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी वारंवार महाराष्ट्र पोलिस दलाचा उपर्मद करीत होता आणि बिहारची प्रशंसा करीत होता. त्याचे कुठल्या राजकीय पक्षाचे लागेबांधे आहेत, हे सर्वांनाच ठाऊक आहे. आत्महत्येच्या घटनेला राजकीय रंग देण्याचे काम त्याने केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा त्याने एकरी उल्लेख करून बदनामी केली.
Arnab Goswami
Arnab Goswami

नागपूर : रिपब्लीकन वाहिनीवरुन अर्णब गोस्वामी बेताल बोलत सुटला आहे. वारंवार तो महाराष्ट्राचा अपमान तर बिहारची प्रशंसा करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एकेरी भाषा वापरुन त्यांचाही अर्णबने घोर अपमान केला आहे. आता हे सहन केले जाणार नाही, बेताल अर्णब गोस्वामीच्या मुसक्या आवळा, या मागणीचे निवेदन शिवसेनेतर्फे अतिरीक्त पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे.

महाराष्ट्र आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देऊन बेताल वक्तवे करणाऱ्या अर्णब गोस्वामीच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात अतिरिक्त पोलिस आयुक्त नीलेश भरणे यांच्याकडे करण्यात आली आहे.

अर्णब रिपब्लिकन वाहिनीवरच्या चर्चेत सुशांत राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी वारंवार महाराष्ट्र पोलिस दलाचा उपर्मद करीत होता आणि बिहारची प्रशंसा करीत होता. त्याचे कुठल्या राजकीय पक्षाचे लागेबांधे आहेत, हे सर्वांनाच ठाऊक आहे. आत्महत्येच्या घटनेला राजकीय रंग देण्याचे काम त्याने केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा त्याने एकरी उल्लेख करून बदनामी केली. हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान करणारा आहे.

हे अराजक कदापि खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा प्रकाश जाधव यांनी दिला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख राजेश तुमसरे, उपजिल्हाप्रमुख प्रवीण जुमळे, माजी नगरसेवक अजय दलाल, राजेश वाघमारे, विधानसभा संघटक सुनील बॅनर्जी, संदीप रियल पटेल, प्रवीण देशमुख, अनिल देशमुख, राम कुकडे, राजाराम द्वार, टिंकू दिगवा, आशिष देशमुख, सिद्धू कोमे जवार, वाहतूक सेनेचे वसीम भाई, प्रतिक बहुगुणा, सचिन डाखोरे उपस्थित होते.   (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com