...आणि म्हणून पोलिसांनी घातला महापौरांच्या कक्षाला वेढा !

दिव्यांगांनी महापौरांच्या वाहनांपुढे व मागे त्यांची वाहने उभी करून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. अखेर समितीचे अध्यक्ष भजभुजे यांना निवेदन घेऊन बोलावण्यात आले.
...आणि म्हणून पोलिसांनी घातला महापौरांच्या कक्षाला वेढा !
Sarkarnama Banner

नागपूर : महानगरपालिकेच्या आत्तापर्यंत झालेल्या सर्वच महापौरांनी आणि आयुक्तांनी दिव्यांगांना फक्त आश्‍वासनेच दिली. स्टॉल देण्याचे कबूल करूनही आजपर्यंत स्टॉल तर दिलेच नाहीत, पण दिव्यांगांनी स्वतःहून लावलेले स्टॉल्सही हटविले. त्यामुळे आक्रमक झालेल्या दिव्यांगांनी महानगरपालिकेवर धडक दिली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी महापौरांच्या कक्षाला काल वेढा घातला. So the police cordoned off the meyors office.

स्टॉलवर अतिक्रमण विभागाकडून होत असलेली कारवाई रोखण्याची मागणी करीत दिव्यांगांनी महापालिकेत धडक दिली. महापौरांच्या वाहनापुढे तसेच मागे दिव्यांगांनी वाहने उभी करून एकप्रकारे जॅमरच लावले. महापालिकेने रस्त्याच्या कडेला असलेल्या दिव्यांगांचे स्टॉल हटविण्याची कारवाई केली. अजूनही ही कारवाई सुरू असल्याने संतप्त झालेल्या दिव्यांगांनी आज विदर्भ विकलांग संघर्ष समितीचे अध्यक्ष गिरिधर भजभुजे यांच्या नेतृत्वात महापालिकेवर धडक दिली. दिव्यांगांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांची आक्रमकता बघता महापालिकेने पोलिसांना आमंत्रित केले. महापौर कक्षाभोवती पोलिसांचा गराडा होता. 

दुसरीकडे दिव्यांगांनी महापौरांच्या वाहनांपुढे व मागे त्यांची वाहने उभी करून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. अखेर समितीचे अध्यक्ष भजभुजे यांना निवेदन घेऊन बोलावण्यात आले. गठई कामगारांच्या शेडच्या बाजूलाच दिव्यांगांना स्टॉल देण्याबाबतची आठवण भजभुजे यांनी महापौरांना करून दिली. आतापर्यंत पदावरील सर्वच महापौर तसेच आयुक्तांनी दिव्यांगांना खोटे आश्वासन दिल्याचे आरोपही भजभुजे यांनी केला. स्टॉल तर दिले नाहीच, शिवाय जे सुरू आहेत, त्यावर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई रोखण्यात यावी, अशी मागणी भजभुजे यांनी महापौरांकडे केली. महापौरांशी चर्चा सुरू असतानाच बाहेर दिव्यांगांची घोषणाबाजी सुरू असल्याने परिसर दणाणला. 

महापालिकेकडून दिव्यांगांचे स्टॉल हटविण्यात येत आहे. दिव्यांगांची स्टॉलची मागणी असून ते अजून पूर्ण झाली. त्यात कारवाई सुरू केली. महापौरांनी कारवाई रोखण्याचे आश्वासन दिले. 
- गिरिधर भजभुजे, अध्यक्ष, विदर्भ विकलांग संघर्ष समिती.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in