...आणि मग जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दारूबंदीचा निर्णय  - and collector decide to ban liquor in nagpur district | Politics Marathi News - Sarkarnama

...आणि मग जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दारूबंदीचा निर्णय 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 10 मे 2020

नागपूर महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही दारू दुकाने सुरू करण्यास परवानगी नाकारली. तसेच सवलती देण्यासही नकार दिला. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनीही दारू दुकानांबाबतचा निर्णय 24 तासांनी घेतला.

नागपूर : 4 मे रोजी सकाळच्या सुमारास सकारात्मक असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री दारूबंदीचा निर्णय घेतल्याने इतर अधिकारीही आश्‍चर्यचकित झाले. कुणाच्या सूचनेवरून त्यांनी निर्णय घेतला, याबाबत आजही जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात उलटसुलट चर्चा सुरु आहेत. 

लॉकडाउन लागू करताना सरकारने काही प्रमाणात शिथिलता आणली. महसुलावर होत असलेला परिणाम लक्षात घेता दारू दुकाने सुरू करण्यासोबत रजिस्ट्रीचे कामही सुरू करण्यास परवानगी दिली. काही अटी लादून उद्योग, व्यवसाय व इतर कामांनाही मंजुरी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता काही जिल्ह्यांत जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांनी सुट देण्यास नकार दिला. नागपूर महानगर पालिका आयुक्त तुकाराम मूंढे यांनीही दारू दुकाने सुरू करण्यास परवानगी नाकारली. तसेच सवलती देण्यासही नकार दिला. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनीही दारू दुकानांबाबतचा निर्णय 24 तासांनी घेतला. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दारू दुकानांबाबत सोमवारी सकाळी निर्णय लागू करायचा असल्याने अधिकाऱ्यांनी रात्रीच चर्चा केली. उत्पादन शुल्क विभागाकडून काही नियम मार्गदर्शक सूचना सांगण्यात आल्या. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळीच याबाबत चर्चा झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी सकारात्मक होते. दुपारी त्यांनी यावर कोणताही निर्णय घेतला नाही. गृह आणि उत्पादन शुल्क विभागाकडून निर्णयाबाबत विचारणा होत होती. जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला नसल्याची माहिती मंत्रालय पातळीवर कळविण्यात आली. रात्री त्यांनी फाईलवर स्वाक्षरी करून दारूबंदीचा आदेश काढला. यामुळे अधिकारीही आश्‍चर्य चकित झाले. विशेष म्हणजे शहरी भागात दारूबंदी असल्याने ग्रामीण भागात दारूला परवानगी दिल्यास ताण कमी होईल, असेही काही अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख