अमरावती शिक्षक मतदारसंघ : किरण सरनाईक आघाडीवर...

फारसे चर्चेत नसलेले स्वतंत्र उमेदवार किरण सरनाईक यांनी पहिल्या फेरीतच आघाडी घेतली. विद्यमान आमदार आणि मातब्बर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना त्यांनी पहिल्याच फेरीत मागे टाकल्याने अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला आहे.
Ballet Paper Counting
Ballet Paper Counting

अमरावती : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीचा निकाल नुकताच हाती आला आहे. पहिल्या फेरीत स्वतंत्र उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर आहेत. 

किरण सरनाईक यांना पहिल्या फेरीत ३१४९, राज्यातील महाविकास आघाडी समर्थीत श्रीकांत देशपांडे यांना २२९९ तर स्वतंत्र उमेदवार शेखर भोयर यांना २०१० मते मिळाली आहेत. सरनाईक हे देशपांडे यांच्यापेक्षा ८५० मतांची आघाडी घेऊन पुढे निघालेले आहेत.

निवडणुकीदरम्यान फारसे चर्चेत नसलेले स्वतंत्र उमेदवार किरण सरनाईक यांनी पहिल्या फेरीतच आघाडी घेतली. विद्यमान आमदार आणि मातब्बर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना त्यांनी पहिल्याच फेरीत मागे टाकल्याने अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला आहे. प्रथम फेरीत आतापर्यंत १४ हजार मतांची मोजणी झाली. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com