मुंढेंवरील आरोप; आयोगाने महिला अधिकाऱ्याला मागितले पुरावे

कोविडमुळे बाळाला घेऊन प्रवास शक्य नसल्याने घरून काम करण्याची परवानगी आयुक्तांना मागितली होती. परंतु परवानगी नाकारल्याची तक्रार या महिला अधिकाऱ्यांनी आयोगाकडे केली. एवढेच नव्हे तर प्रसुती संबंधी महिलांच्या कायदेशीर सवलती न देता नोकरीतून बडतर्फ करण्याबाबत मुंढे यांनी नोटीस दिली होती.
Tukaram Mundhe
Tukaram Mundhe

नागपूर : नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या (:) महिला अधिकाऱ्यानी महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर गंभीर आरोप लावत राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी काल या प्रकरणाची आॅनलाईन सुनावणी घेतली. मुंढे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. शर्मा यांनी आरोपाबाबतची पुरावे सादर करण्याचे निर्देश महिला अधिकाऱ्याला दिले. पुरावे सादर केल्यानंतर अंतिम सुनावणी होणार आहे.

एनएसएससीडीसीएलच्या महिला अधिकाऱ्यांनी जूनमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाकडे मनपा आयुक्त मुंढे यांच्याविरुद्ध प्रसुती रजा नाकारणे, मानसिक त्रास देणे तसेच अपमानजनक वागणूक दिल्याबाबत तक्रार दाखल केली होती. यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी आयुक्तांना नोटीस बजावली होती. यावर काल त्यांनी ऑनलाईन सुनावणी घेतली. दिल्लीतील कार्यालयातून ऑनलाईन असलेल्या शर्मा यांनी दोघांनाही बाजू मांडण्याची संधी दिली. मुंढे यांनी महिला अधिकाऱ्यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. यावेळी महिला अधिकाऱ्यांनी आयुक्त मुंढे यांच्या अपमानजनक वागणुकीमुळे तसेच मानसिक त्रास दिल्याबाबत यातना सहन कराव्या लागल्याचे सांगितल्याचे सुत्राने सांगितले.

आयोगाच्या अध्यक्ष शर्मा यांनी महिला अधिकाऱ्यास आरोपाबाबतचे पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले. आयुक्तांविरुद्ध आरोप सिद्ध होईल, असे लेखी कागदपत्राचे पुरावे असल्याचे महिला अधिकाऱ्यांनी सांगितले. आयोगाकडे पुरावे सादर झाल्यानंतर अंतिम सुनावणी होईल. आयोगाचा निर्णय राज्य सरकारसह दोघांनाही कळविण्यात येईल, असे आयोगाच्या अध्यक्ष शर्मा यांनी दोघांपुढे नमुद केल्याचेही सुत्राने सांगितले. तीन महिन्यांच्या बाळाला नागपूरपासून १०० किमी अंतरावरील गावी ठेवण्यात आले आहे. कोविडमुळे बाळाला घेऊन प्रवास शक्य नसल्याने घरून काम करण्याची परवानगी आयुक्तांना मागितली होती. परंतु परवानगी नाकारल्याची तक्रार या महिला अधिकाऱ्यांनी आयोगाकडे केली. एवढेच नव्हे तर प्रसुती संबंधी महिलांच्या कायदेशीर सवलती न देता नोकरीतून बडतर्फ करण्याबाबत मुंढे यांनी नोटीस दिली होती, असेही तक्रारीत नमुद केले आहे.   (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com