मानवासहित संपूर्ण जीवसृष्टी विनाशाच्या उंबरठ्यावर...

रानतुळस, घाणेरी, मांगुरमासे आणि जलपर्णीमुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. रानतुळस, जलपर्णी शहरातच नव्हे तर राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्पासह सर्वत्र आढळते. जंगलातील वन्यप्राणी, पाळीव प्राण्यासाठी उगवणारे गवत, तरोट्यासारखे अनेक जैवविविधता नष्ट होऊ लागली आहे.
Prithiv
Prithiv

नागपूर : वारेमाप वृक्षतोड आणि शेतांमध्ये रासायनिक खतांचा वापर यांमुळे उपद्रवी कीटकांसोबत निसर्गचक्र चालविणाऱ्या किटकांचाही ऱ्हास होत गेला. Along with the invasive insects, the insects that run the cycle of nature also began to decline परिणामी जागतिक तापमान वाढू लागले. त्यामुळे अंफानसारखी चक्रीवादळे आक्रमण करू लागली. So hurricanes like Anfan began to attack जैवविविधता घटल्यानेच चक्रीवादळे आणि आजार वाढू लागले. मानवाच्या बेजबाबदार वागण्यामुळे आज मानवासहित संपूर्ण जीवसृष्टी विनाशाच्या उंबरठ्यावर आली Today, all life, including humans, is on the brink of extinction असल्याचे महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेषराव पाटील Dr. Sheshrao Patil यांनी सांगितले.

रात्रीच्या अंधारात लुकलुकणारे काजवे हे काही वर्षांपूर्वी प्रकाशाचे स्त्रोत होते. पण आता काजवे दिसणे हा नशिबाचा भाग बनला आहे. गेल्या तीस वर्षांत काजव्यापाठोपाठ असे कितीतरी बहुउपयोगी कीटक मानवाने संपविले आहे. त्याचे गंभीर परिणाम येणाऱ्या काळात भोगावे लागण्याची शक्यता आहे. येत्या पाच वर्षांत जागतिक तापमान वाढीमुळे आणखी भयानक संकटे ओढवणार आहेत. त्यामुळे निसर्ग कधी कोरोना बनून तर कधी अंफान निसर्गासारख्या चक्रीवादळाच्या रूपाने आपल्याला आपली जागा दाखवून देत असल्याचे अभ्यासकांनी केलेल्या निरीक्षणातून पुढे आले आहे. 

काजवे पूर्वी दिसायचे. त्याकाळी बऱ्याच पाणथळ जमिनी अस्तित्वात होत्या. ठिकठिकाणी असलेल्या पाणथळ जमिनींमुळे भूजल पातळी काठोकाठ भरलेली असायची. परिणामी जमिनीतील आद्रता पूर्ण वर्षभर टिकून राहत होती. त्यावेळी मोठमोठी गवताची कुरणे अस्तित्वात होती. त्यामुळे उंच वाढलेल्या दाट गवतामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नव्हता. तेथे काजव्यांसाठी योग्य आद्रता वर्षभर टिकून राहत होती. तसेच शेताच्या बांधांवर नागफणी, काटेरी झाडांच्या कुंपणाच्या ठिकाणीही देखील आद्रता चांगल्या प्रकारे राहत होती. त्याबरोबरच या ठिकाणी काजव्यांच्या अळ्या रात्री चमकताना दिसत. हळूहळू पाणथळ जागा आणि गवताळ कुरणे नष्ट होत गेली. 

शेतात देखील माणसाने फवारणी आणि रासायनिक खते टाकायला सुरुवात झाली. त्यामुळे इतर उपद्रवी कीटकांपाठोपाठ परागीभवनासाठी उपयुक्त असणाऱ्या मधमाश्या आणि इतर काजव्यांसारख्या शेतीस उपयुक्त कीटक देखील नष्ट होऊ लागले. रात्री खांबावरील विजेच्या दिव्यांमुळे पंख उघडून लुकलुक करणाऱ्या या कीटकांना जोडीदार शोधण्यात अडथळे येऊ लागले. परिणामी, काजव्यांच्या संख्येत घट होत गेली.
 

मनुष्यप्राण्यांच्या निसर्गविरोधी कृत्यामुळे निसर्ग लयास जात आहे. त्यातील जीवनाचा एकूण एक थेंब शोषून त्याचा कागदी पैसा बनवतो आणि नंतर हाच माणूस त्या पैशाने निसर्गात भ्रमंती करायला येतो. निसर्गाला बटीक समजत असल्याने हवा तसा उपभोग घ्यायचा आणि पैसे फेकून मोकळे व्हायचे. या वृत्तीमुळे आज सर्वत्र पृथ्वीवरील जीवन क्षणोक्षणी नष्ट होत आहे, असे प्राणिशास्त्र अभ्यासक प्रा. भूषण भोईर यांचे म्हणणे आहे. 

हेही वाचा : जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त रस्त्यावर; २६ दुकांनाना सील, सव्वा लाखांचा दंड वसुल..
 
रानतुळस, घाणेरी, मांगुरमासे आणि जलपर्णीमुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. रानतुळस, जलपर्णी शहरातच नव्हे तर राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्पासह सर्वत्र आढळते. जंगलातील वन्यप्राणी, पाळीव प्राण्यासाठी उगवणारे गवत, तरोट्यासारखे अनेक जैवविविधता नष्ट होऊ लागली आहे. परिणामी, जंगलातील गवत कमी झाल्याने पाळीव जनावरे आणि वन्यप्राण्यांचे खाद्य कमी झाले आहे. यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. 
डॉ. शेषराव पाटील
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com