‘बाई, बूब्स आणि ब्रा’ची चर्चा चळवळ बनावी, ‘यांनी’ दिले गृहमंत्र्यांना पत्र...

सोशल माध्यमं वापरणाऱ्या मुली आणि महिलांनी आपल्यासोबत ऑनलाइन छेडखानी घडल्यास, त्याची त्वरित पोलीस तक्रार करावी. जेणेकरून अशा सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या वेळीच आवळणं शक्य होईल.
Hemangi Kavi
Hemangi Kavi

नागपूर : अभिनेत्री हेमांगी कवी Hemangi Kavi यांनी बिनधास्तपणे 'बाई, बूब्स आणि ब्रा'बाबत आपली मतं मांडली, पण या निमित्तानं पुन्हा एकदा 'सायबरबुलिंग' म्हणजेच, सोशल माध्यमावरील छेडखानीसारख्या गंभीर विषयाची चर्चा सुरू झाली. ‘बाई, बूब्स आणि ब्रा’पासून सुरू झालेली चर्चा एक चळवळ बनावी lady boobs and bras discussion should become movement आणि अशा गुन्ह्यांना आवर घालण्यासाठी सायबरबुलिंग करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणारे कठोर कायदे करण्याची गरज, सायबर आणि सोशल मिडिया तज्ज्ञ अजित पारसे Ajit Parse यांनी व्यक्त केली आहे. याबाबतची मागणी करणारं एक पत्र त्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील Home Minister Dilip Walse Patil यांना लिहिलं आहे.

हेमांगी कवी यांनी चपात्या करतानाचं रिल सोशल माध्यमावर अपलोड केलं आणि त्यावर अनेक नकारात्मक कमेंट्स आल्या, या कमेंट्स सायबरबुलिंगच्या प्रकारात मोडतात. हेमांगीसारख्या असंख्य मुली आणि महिलांना रोज सोशल माध्यमावर सायबरबुलिंग म्हणजेच ऑनलाइन छेडखानीचा सामना करावा लागतो आहे. आजच्या इंटरनेटच्या जगात ऑनलाइन होणारी छेडखानी मुली किंवा महिलांच्या मानसिक आरोग्यावर आघात करू शकते, किंवा सामाजिक जीवनात त्यांना बदनाम करू शकते, हा गंभीर गुन्हा असून, याला आवर घालण्यासाठी सायबरबुलिंग करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणारे कठोर कायदे करण्याची गरज अजित पारसे यांनी व्यक्त केली आहे.

सायबरबुलिंग, सायबरस्टाकिंग आणि सायबर हरॅशमेंट, हा एकचं प्रकार आहे, सोशल माध्यमावर अश्लील कमेंट्स किंवा चॅटिंग करणे, कुणाची फेक आयडी तयार करुण बदनामी करणे, नको त्या बाबी टॅग करणे, ब्लॅकमेलिंग करणे. मुली किंवा महिलांसोबत घडणारे असे सर्व प्रकार ऑनलाइन छेडखानीत मोडतात. आणि सोशल माध्यमात वावरताना याचा सर्वाधिक सामना महिला आणि मुलींना करावा लागतो. देशात सोशल मिडिया वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. यंदा तो आकडा ४४ कोटींच्या वर गेला आहेत, देशात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढून ६२४ मिलीयनपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच सध्या देशात एकूण लोकसंख्येच्या ४० टक्क्यांच्या आसपास लोक इंटरनेटचा वापर करतात. 

इंटरनेट आणि सोशल मिडिया आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. त्यामुळे इंटरनेटच्या जगात वावरताना, देश विदेशात कुठेही बसून महिलांची ऑनलाइन छेडखानी करू शकतो. सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या छेडखानीतून महिलांना संरक्षण देण्यासाठी कठोर कायदे आपल्याकडे आहेत. पण ऑनलाइन छेडखानी रोखण्यासाठी इतके प्रभावी कायदे नाहीत, त्यामुळे एखाद्या मुलीसोबत सायबरबुलिंगचा प्रकार घडला, तर त्या गुन्हेगाराला कुठुनंही खेचून आणता येईल आणि पोलीस कोठडीपर्यंत पोहोचवता येईल, अशा कठोर कायद्याची आज खरंच गरज आहे. तेव्हाच हेमांगी कवी सोबत घडलेला प्रकार इतर मुलींसोबत घडणार नाही.

इंटरनेटचं जग आणि सोशल माध्यमाचा वाढता वापर, यामुळे आपलं समाजजीवन ढवळून निघालं आहे. सोशल माध्यमांमुळे संपूर्ण जग एक ग्लोबल व्हिलेज झालं आहे. या माध्यमाच्या अनेक सकारात्मक बाजू आहेत. पण त्याच्या नकारात्मक बाजूंकडे दुर्लक्ष केल्यास, त्याची मोठी किंमत आपल्या आई- बहिणींना मोजावी लागू शकते. त्यामुळेच 'बाई, बूब्स आणि ब्रा'पासून सुरू झालेली चर्चा एक चळवळ बनावी, आणि यातून धडा घेत आपल्या शासनकर्त्यांनी कठोर कायदे करावे आणि दुसरीकडे सोशल माध्यमं वापरणाऱ्या मुली आणि महिलांनी आपल्यासोबत ऑनलाइन छेडखानी घडल्यास, त्याची त्वरित पोलीस तक्रार करावी. जेणेकरून अशा सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या वेळीच आवळणं शक्य होईल. आणि ऑनलाइन छेडखानीला आळा बसेल.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com