ओबीसी आरक्षणासाठी अहेरअल्लीचे राऊत देणार सरपंचपदाचा राजीनामा...

आज आपण राजकीय आरक्षण वाचवू शकलो, तरच भविष्यात शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण कायम राहील. नाहीतर त्यासाठी वेगळा लढा द्यावा लागेल आणि ती यापेक्षाही मोठी लढाई असेल.
OBC Reservation
OBC Reservation

नागपूर : महाविकास आघाडी सरकार Mahavikas Aghadi Government पाच वर्ष टिकणार की पडणार, या मुद्यानंतर दुसरा कुठला विषय सध्या चर्चेत असेल तर तो म्हणजे ओबीसी आरक्षण. OBC Reservation ओबीसी नेते आणि जनता आज एकत्र आली नाही, तर उद्या नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणावरही गंडांतर येणार, हे निश्‍चित आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून जर ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करून देऊ शकत नसतील, तर सरपंचपदाचा राजीनामा स्वीकारावा, If OBC reservations cannot be reversed, the resignation of Sarpanch should be accepted असे यवतमाळ जिल्ह्याच्या झरीजामणी तालुक्यातील अहेरअल्लीचे सरपंच हितेश राऊत यांनी म्हटले आहे.

ओबीसी आरक्षणासाठी आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. लोणावळ्याची परिषद चांगली झाली. पण त्यानंतर आरक्षणाच्या लढ्यासाठी ओबीसी समाज फार पुढे सरकलेला नाही. राजकीय आरक्षण गेल्यास ओबीसींमधून नवीन नेतृत्व उदयास येणे बंद होणार आहे. त्यामुळे आता आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसी प्रवर्गातल्या समजांनी आक्रमक होणे गरजेचे आहे. ‘अभी नही, तो कभी नही’, अशी वेळ आली आहे. त्यामुळे आता विचार, चिंतन बैठका झाल्या असतील तर ओबीसी नेत्यांच्या नेतृत्वात समाजबांधवांनी रस्त्यावर उतरणे गरजेचे झाले आहे.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यभर चर्चेत आहे. लोणावळा येथे दोन दिवसीय ओबीसी चिंतन परिषदेत ओबीसी आरक्षण वाचवणे हाच चर्चेचा केंद्रबिंदू होता. तरीही या परिषदेत राजकीय भाष्य करण्यात आले. ओबीसी नेत्यांनी एकमेकांना चिमटेही काढले. पण हे करताना पूर्ण फोकस हा ओबीसी आरक्षणावरच होता. तो तसाच कायम रहावा. ओबीसींनी एकत्र राहणे कसे गरजेचे आहे, यावर सर्वपक्षीय नेत्यांनी यावेळी प्रकाश टाकला. तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षात असा, पण ओबीसींचा हा लढा यशस्वी करणे गरजेचे आहे. यावर सर्वांचे एकमतही झाले. पण ही परिषद संपल्यानंतर ओबीसी या मुद्यावर सर्वांनी एक राहिले पाहिजे. त्याचे वेगळे राजकारण होऊ नये. 

सद्यःस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी प्रवर्गातल्या उमेदवारांनी एकमेकांच्या विरोधात लढू नये, असा एक मतप्रवाह या परिषदेतून पुढे आला. पण ग्रामीण भागातील राजकारण पाहता, हे शक्य होईल, असे वाटत नाही. पण असे झाले तरच ओबीसी प्रवर्ग एकत्र आला, असे म्हणता येईल. आज आपण राजकीय आरक्षण वाचवू शकलो, तरच भविष्यात शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण कायम राहील. नाहीतर त्यासाठी वेगळा लढा द्यावा लागेल आणि ती यापेक्षाही मोठी लढाई असेल. त्यामुळे काळाची पावले ओळखून आजच हा लढा तीव्र करण्याची गरज आहे. आरक्षण वाचवण्याच्या लढ्यात मंत्रिपद जरी आले, तर त्याची परवा करणार नाही, असे ओबीसी मंत्री वडेट्टीवार यांनी म्हटलेच आहे. सर्व ओबीसी नेत्यांनी आरक्षणाच्या मुद्यावर वडेट्टीवारांसारखीच घेण्याची गरज असल्याचेही अहेरअल्लीचे सरपंच हितेश राऊत यांनी सांगितले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com