50 पोलीसांपुढे नमल्या 25 महीला, अन आयुक्तांविरोधातील आंदोलन फसले 

निषेध करण्यासाठी महिला येत असल्याची कुणकुण महापालिका प्रशासनालाही लागली. महापालिका प्रशासनाने पोलिसांना संरक्षण मागितले. त्यामुळे दुपारी चारच्या सुमारास पोलिस महापालिकेत पोहोचले. दरम्यान, काही महिलाही महापालिकेत आल्या. महापालिकेच्या प्रशासकीय इमारत परिसरात या महिला एकत्र आल्याचे दिसताच पोलिसांनी त्यांना तेथून हुसकावून लावले.
SS07 POLICE BANDOBAST AT NMC FOR MORCHA
SS07 POLICE BANDOBAST AT NMC FOR MORCHA

नागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी जवळपास 25 महीला मोठ्या तयारीने महापालिकेत आल्या. पण तेथे आधीच 50 पोलीसांचा बंदोबस्त तैनात होता. तरीही महिलांनी सोबत आणलेले बॅनर पोस्टर बाहेर काढून निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांपुढे त्यांचा निभाव लागला नाही. महीलांची तयारी वाया गेली आणि आयुक्तांविरोधातील आंदोलन फसले. 

आयुक्ताविरुद्ध बॅनर, पोस्टर आदी घेऊन आलेल्या महिलांना पोलिसांनी महापालिकेबाहेरच नव्हे परिसरातूनही बाहेर काढले. राष्ट्रीय महिला आयोगाने महिला अधिकाऱ्याला अपमानजनक वागणूक दिल्याप्रकरणी आयुक्त मुंढे यांना सोमवारी नोटीस बजावली. याबाबतचे वृत्त शहरात पसरले अन्‌ नोटीस बजावल्याचे कारणही स्पष्ट झाले. त्यामुळे शहरातील काही महिलांनी महापालिकेत आयुक्तांविरुद्ध नारे, निदर्शने करण्याचा बेत आखला. निषेध करण्यासाठी महिला येत असल्याची कुणकुण महापालिका प्रशासनालाही लागली. महापालिका प्रशासनाने पोलिसांना संरक्षण मागितले. त्यामुळे दुपारी चारच्या सुमारास पोलिस महापालिकेत पोहोचले. दरम्यान, काही महिलाही महापालिकेत आल्या. महापालिकेच्या प्रशासकीय इमारत परिसरात या महिला एकत्र आल्याचे दिसताच पोलिसांनी त्यांना तेथून हुसकावून लावले. त्यांना मुख्य प्रवेशद्वाराबाहेर काढण्यात आले. मात्र, मुख्य प्रवेशद्वाराजवळूनही या महिलांना हुसकावून लावण्यात आले. त्यामुळे त्यांचा आंदोलनाचा बेत फसला. 

स्मार्ट सिटी कंपनीच्या कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याने आयुक्तांच्या विरोधात राष्ट्रीय महीला आयोगाकडे तक्रार केली. कार्यालयात कामकाजादरम्यान आयुक्तांनी अपमानजनक वागणूक दिल्याचा आरोप सदर महीला कर्मचाऱ्याने केला आहे. त्यावरुन आयोगाने आयुक्तांना नोटीस बजावली आहे. सात दिवसाच्या आत उत्तर दाखल करण्याची नोटीसमधून आयुक्तांना कळविण्यात आले आहे. या प्रकारामुळे शहरातील काही महीलांनी पालिकेत आयुक्तांच्या विरोधात आंदोलन करण्याचा बेत आखला होता. त्याची सर्व पूर्वतयारीही त्यांनी केली होती. पण पालिकेत येवढ्या मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्तावर असतील, याचा अंदाज त्यांना आला नाही. तेथे पोहोचताच पोलीसांना सर्व महिलांना पालिकेतून हुसकावून लावले. त्यामुळे महिलांचा आंदोलनाचा बेत फसला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com