‘यानंतर तुमचा नंबर आहे, आता तुम्हाला जेलमध्ये टाकणार...’  - afterh this is your number now i will put you into the jail | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

‘यानंतर तुमचा नंबर आहे, आता तुम्हाला जेलमध्ये टाकणार...’ 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 22 मार्च 2021

यांच्या धमक्यांना यापुढेही घाबरणार नाही. यांचे काळे धंदे मी सभागृहासमोर मांडत असल्यामुळे सरळ सरळ गुंदागर्दी सुरू केली आहे. आज तर सावंतांनी हद्दच केली. चालत चालत माझ्या बाजूने जात असताना त्यांनी मला धमकी दिली, की यांनंतर तुमचा नंबर आहे, आता तुम्हाला जेलमध्ये टाकू. 

नागपूर : शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी आपल्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज केला आहे. सभागृहाच्या बाहेर एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी शिवसेनेवर चांगलेच तोंडसुख घेतले. यापूर्वीही शिवसेनेकडून आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

यानंतर तुमचा नंबर आहे, आता तुम्हाला जेलमध्ये टाकणार, तुम्हाला बाहेर फिरणे मुश्‍कील करून टाकू, अशी धमकी अरविंद सावंत यांनी दिल्याचे खासदार राणा म्हणाल्या. जेव्हापासून महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत आली, तेव्हापासून यांना वाट्टेल ते करत आहे. कुणालाही जेलमध्ये टाकत आहेत. मनसुख हिरेनला हातपाय बांधून फेकून देण्यात आले. यापूर्वीही यांनी मला धमक्या दिल्या, पण यांच्या धमक्यांना मी घाबरले नाही. कारण लाखो लोकांनी मते देऊन मला या सभागृहात पाठवले. त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सभागृहात प्रश्‍न मांडणारच आहे. संविधानाने आम्हाला दिलेला तो अधिकार आहे. त्यामुळे यांच्या धमक्यांना यापुढेही घाबरणार नाही. यांचे काळे धंदे मी सभागृहासमोर मांडत असल्यामुळे सरळ सरळ गुंदागर्दी सुरू केली आहे. आज तर सावंतांनी हद्दच केली. चालत चालत माझ्या बाजूने जात असताना त्यांनी मला धमकी दिली, की यांनंतर तुमचा नंबर आहे, आता तुम्हाला जेलमध्ये टाकू. 

महिला खासदाराला सभागृहाच्या आत अशा प्रकारे धमकावणे कितपत योग्य आहे, असा सवाल खासदार राणा यांनी उपस्थित केला. यापूर्वीही शिवसेनेकडून मला गंभीर स्वरूपाच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. ज्या चेहऱ्यावर तू घमंड करते, तो चेहरा ऍसिड टाकून विद्रूप करून टाकू, अशीही धमकी यापूर्वी दिल्याचे त्या म्हणाल्या. यापूर्वी 8 फेब्रुवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर अभिनंदनाच्या प्रस्तावावर मी बोलत होती. गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या कामांची माहिती मी संसदेत सांगितली होती. गेल्या दहा महिन्यांपासून लोकांचे काय मत आहे, हेसुद्धा मी त्या ठिकाणी सांगितले होते. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी मला एक पत्र मिळाले होते. ज्या चेहऱ्यावर तू घमंड करते तो चेहरा ऍसिड टाकून विद्रूप करून टाकू, अशी धमकी त्या पत्रात होती. तुमचे पती तथा आमदार रवी राणा यांनासुद्धा ज्या पद्धतीने आम्ही अन्य लोकांशी वागतो, तशाच पद्धतीने त्यालाही वागणूक दिली जाईल. तुम्हाला फिरण्याच्या लायकीचे सोडणार नाही, अशी धमकीसुद्धा त्या पत्रातून देण्यात आली होती, अस खासदार नवनीत राणा यांनी सांगितले. तेव्हा त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे तक्रार केली होती. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख