Navnit Rana-Ravi Rana
Navnit Rana-Ravi Rana

खासदार नवनित यांच्यानंतर आमदार रवी राणाही झाले कोरोनाबाधित

आमदार रवी राणांच्या संपर्कात आलेल्यांचीही तपासणी केली जात आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःहून तपासणी करुन घ्यावी आणि लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार करुन घ्यावे, असे आवाहन आमदार रवी राणा यांनी केले आहे.

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांच्या कुटुंबातील १० सदस्य चार दिवसांपूर्वी कोरोनाबाधित झाल्यानंतर त्यांच्या पत्नी खासदार नवनित राणाही बाधित झाल्या. कुटुंबातील एकमेव उरलेले आमदार रवी राणा यांचा अहवाल काल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला असल्याचे युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे संपूर्ण राणा कुटुंब कोरोनाबाधित झाले आहे.

चार दिवसांपूर्वी राणा कुटुंबातील १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर नवनित आणि रवी राणा दोघेही कुटुंबियांकडे लक्ष देण्यात व्यग्र होते. नवनित राणा अमरावतीला तर रवी राणा नागपुरला आई-वडिलांच्या सेवेत होते. नवनित राणा यांना काल अस्वस्थ वाटत असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट आणि थ्रोट स्वॅब घेण्यात आले. रॅपिड टेस्टमध्ये नवनित यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. इकडे नागपुरला माता-पित्याची सेवा करताना स्वतःच्या आरोग्याची काळजी न करणारे आमदार रवी राणा यांना कोरोनाची लागण झाली. नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डीन डॉक्टर शैजल मित्रा यांच्या देखरेखीखाली त्यांची तपासणी झाली. त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला.

आता आमदार रवी राणांच्या संपर्कात आलेल्यांचीही तपासणी केली जात आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःहून तपासणी करुन घ्यावी आणि लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार करुन घ्यावे, असे आवाहन आमदार रवी राणा यांनी केले आहे.   (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com