सीबीआय चौकशी झाली की, ठाकरे सरकारचा 'हा'सुद्धा घोटाळा बाहेर निघेल...

एकदा सीबीआय चौकशी झाली की सर्व घोटाळे बाहेर निघणार आहेत. शेतकऱ्यांचा धान खरेदी करून पुढे त्याचा योग्य पुरवठा करणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.
Sunil Mendhe
Sunil Mendhe

नागपूर : पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे Bhandara and Gondia District अर्थकारण मुख्यत्वे धानाभोवती फिरते. पण भ्रष्टाचारी ठाकरे सरकारमुळे Due to Thackeray Government यामध्ये २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप खासदार सुनील मेंढे MP Sunil Mendhe यांनी केला आहे. वारंवार आवाज उठवूनही भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता या घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. एकदा सीबीआय चौकशी झाली की, ठाकरे सरकारचे सर्व घोटाळे बाहेर निघतील, असेही त्यांनी सांगितले. 

खासदार मेंढे म्हणाले, भंडारा - गोंदिया जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात धान खरेदी होते. केंद्र शासन त्यासाठी राज्यांना पैसे देते. मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून ही खरेदी केली जाते. जेव्हापासून महाराष्ट्रात ठाकरे सरकार आले, तेव्हापासून धान खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आहे. यासाठी आम्ही वेळोवेळी आवाज उठविला आहे. स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी तर राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही तक्रारी केल्या आहेत. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. कारण हे सर्व लोक एकमेकांच्या सहमतीने आणि मदतीने हा घोटाळा करीत आहेत. 

येथे काही उपयोग होत नसल्यामुळे दिल्लीला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. धान उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली. त्यांनी तेव्हाच केंद्रीय चमू पाठवली आणि चौकशी केली. पण त्या चौकशीनेही समाधान झाले नाही. कारण हा घोटाळा फार मोठा आहे आणि हा भ्रष्टाचार थांबवला गेला नाही, तर धान उत्पादक शेतकरी देशोधडीला लागणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी झाली पाहिजे. त्याशिवाय शेतकऱ्यांना दिलासा देणे शक्य होणार नाही, असे खासदार मेंढे म्हणाले. 

फुड सेक्रेटरी सुधांशू पांडे यांच्याशी कालच भेट झाली. त्यांना भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील हा भ्रष्टाचार सांगितला. त्यांनी म्हणणे मान्य केले आहे. ते म्हणाले की, या प्रकरणाची सीबीआय चौकशी लावू आणि दोषींना कठोर शिक्षा मिळेल, याची व्यवस्था करू. त्यामुळे आता शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होईल आणि हा भ्रष्टाचार थांबेल, अशी आशा आहे. तरीही हे प्रकरण तडीस नेल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असेही सुनील मेंढे यांनी सांगितले. 

दोन्ही जिल्ह्यांतील धान खरेदी केंद्र हे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून वाटले गेले. त्यामुळे साहजिकच ही सर्व केंद्रे सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांकडे आहेत आणि हे लोक स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम करत आहेत. शेतकऱ्यांचा धान गोदामात जातच नाही, तर इतर राज्यांतून धान मागवून कोठारांमध्ये भरला जात आहे. शेतकऱ्यांचा चांगल्या प्रतीचा धान स्थानिक बाजारांत कमी भावात विकला जात आहे. एक प्रकारे शेतकऱ्यांना लुटण्याचेच काम या केंद्रांच्या माध्यमातून केले जात आहे. हा घोटाळा छोटामोठा नाही, तर एका सीझनला २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त घोटाळा केला जात असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. 

एकदा सीबीआय चौकशी झाली की सर्व घोटाळे बाहेर निघणार आहेत. शेतकऱ्यांचा धान खरेदी करून पुढे त्याचा योग्य पुरवठा करणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. यंत्रणेमार्फत गरिबांपर्यंत तांदूळ पोहोचवण्याची जबाबदारी मार्केट फेडरेशनच्या माध्यमातून राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे या २०० कोटींच्या घोटाळ्याला राज्य सरकारच जबाबदार आहे, असा खळबळजनक आरोप खासदार मेंढे यांनी केला आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com