भाजपने बावनकुळेंना नाकारले त्यानंतर कार्यकर्ते संभ्रमात अन् आता निधान यांचा बळी... - after bjp rejected bawankule activists aren in confusion now nidhan is victim | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपने बावनकुळेंना नाकारले त्यानंतर कार्यकर्ते संभ्रमात अन् आता निधान यांचा बळी...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 9 जुलै 2021

मी बंडखोरी केली नाही. तांत्रिक कारणामुळे बी फॉर्म जोडता आला नाही. मी भाजप समर्थितच उमेदवार आहे, असे अनिल निधान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या Nagpur Zillha Parishad १६ सदस्यांसाठी पोटनिवडणूक होऊ घातली आहे. यामध्ये शहरालगतच्या गुमथळा या सर्कलकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कारण येथूनच माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे Former Minister Chandrashekhar Bawankule सतत १५ वर्ष सदस्य राहिले आणि सद्यःस्थितीत त्यांचेच खंदे समर्थक अनिल निधान सदस्य होते. पण यावेळी भाजपने येथे एकाही उमेदवाराला बी फॉर्म दिलेला नाही. त्यामुळे ऊर्जावान नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याप्रमाणेच निधान यांचा बळी घेण्याचा प्रयत्न भाजपने केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण निधान यांनी ऐन वेळेवर अपक्ष उमेदवारी दाखल करून भाजपचे नियोजन फिस्कटवल्याचीही चर्चा आहे. There is also talk of fizzling out bjp's planning by felling indipident candidate on time. 

गाडी खराब झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या उमेदवारी अर्जासोबत जिल्हा परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अनिल निधान यांना पक्षाचा बी फॉर्म जोडता आला नाही, अशी सारवासारव भाजपच्यावतीने केली जात आहे. आज पत्रकार परिषद घेऊन भाजपने निधान हेच आमचे अधिकृत उमेदवार असल्याचे जाहीर केले. 

शिस्तबद्ध पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख आहे. कुठलीही निवडणूक अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने भाजप लढते. जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक जाहीर होऊन सुमारे दहा दिवस झाले. जिल्ह्यातील इतर उमेदवारांपर्यंत बी फॉर्म पोहचले. शहराला लागून असलेल्या गुमथळा गावात तो पोहोचू शकला नाही. गाडी खराब झाली तर लगेच पाच मिनिटांत दुसरी गाडी उपलब्ध होऊ शकली असती. भाजपच्या सर्वच नेत्यांकडे महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत. त्यामुळे गाडी खराब झाली यावर कोणाचाच विश्वास नाही. निधान यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे भाजपचे सर्व नियोजन फिस्कटले, हे मात्र खरे. 

भाजपने कोणालाच बी फॉर्म दिला नाही. त्यामुळे समर्थन देण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली. कामठी विधानसभा मतदारसंघात गुमथळा सर्कलचा समावेश आहे. तब्बल पंधरा वर्षे येथून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे निवडून आले होते. त्यांच्याच पुण्याईवर टेकचंद सावरकर हेसुद्धा विधानसभेत दाखल झाले. बाबनकुळे यांना विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर कामठी तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. निधान याचाच बळी ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. गुमथळा जिल्हा परिषद सर्कलमधून भाजपने एकाही उमेदवाराला बी फॉर्म दिला नाही. त्यामुळे येथे भाजपचे कमळ चिन्ह राहणार नाही. 

हेही वाचा : नितीन राऊत राहुल गांधींकडे करणार नाना पटोलेंची तक्रार... ?

मी बंडखोर नाही 
मी बंडखोरी केली नाही. तांत्रिक कारणामुळे बी फॉर्म जोडता आला नाही. मी भाजप समर्थितच उमेदवार आहे, असे अनिल निधान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी आमदार टेकचंद सावरकर, किशोर बेले, योगेश डाफ, किरण राऊत, कैलास महल्ले आदी उपस्थित होते.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख