तब्बल 61 दिवसांनंतर बजाजनगर पुन्हा कोरोनाच्या नकाशावर 

महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांसह भानखेड्यातील दोघे बाधित आठळले आहेत. हे सर्व आमदार निवास येथील विलगीकरणात होते. खासगी रुग्णालयातील बाधित परिचारिका मेडिकलमध्ये काही दिवसांपूर्वी या रुग्णालयातून हलवलेल्या कोरोनाबाधित वृद्धाच्या संपर्कात आली होती.
nagpur zero mile-corona
nagpur zero mile-corona

नागपूर : दर दिवसाला कोरोनाचा उद्रेक होईल, अशीच स्थिती निर्माण होत आहे. हावरापेठ असो की, सतरंजीपुरा कुटुंबच्या कुटुंब कोरोनाने विळख्यात घेतली आहेत. दर दिवसाला कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढतच आहे. काल 20 जणांना बाधा झाल्याचे उघड झाले. तर आज हा आकडा आणखी वाढत 24 वर जाऊन पोचला. 

मेयो, मेडिकल, नीरी आणि एम्सच्या प्रयोगशाळेतून खासगी रुग्णालयातील परिचारिकेसह 24 जण कोरोनाबाधित असल्याचे पुढे आले आहे. विशेष असे की, पहिला कोरोनाबाधित बजाजनगरात आढळून आला होता. यानंतर तब्बल 61 दिवसांनंतर बजाजनगर पुन्हा कोरोनाच्या नकाशावर आले आहे. कोरोनाबाधित आढळून आलेली परिचारिका खासगी रुग्णालयात कार्यरत आहे. या रुग्णालयातील 66 जण विलगीकरणात ठेवण्यात आले. यामुळे एकूण बाधितांची संख्या 583 वर पोहोचली आहे. 

11 मार्च रोजी बजाजनगर येथून शहरात कोरोनाची लागण सुरू झाली होती. मेयोतील यशस्वी उपचारातून बजाजनगरातील पती-पत्नी दोघेही कोरोनामुक्त झाले. त्यानंतर येथे रुग्ण आढळला नव्हता. मात्र, आता एक परिचारिका बजाजनगरात आढळली. कोरोनाची दहशत अनुभवावी लागेल का? अशा विचारांचे काहूर या भागातील नागरिकांच्या मनात उठले आहे. ही परिचारिका धंतोली येथील खासगी रुग्णालयात कार्यरत आहे. परिचारिकेसह नवीन बाधितांमध्ये टिमकी परिसरातील 9, मोमिनपुरा येथील 1, नाईक तलाव येथील 2 तर लोकमान्य नगरातील 2 रहिवासी कोरोनाबाधित असल्याचे आढळले. याशिवाय हंसापुरी येथील एकाला बाधा झाल्याचे पुढे आले. 

महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांसह भानखेड्यातील दोघे बाधित आठळले आहेत. हे सर्व आमदार निवास येथील विलगीकरणात होते. खासगी रुग्णालयातील बाधित परिचारिका मेडिकलमध्ये काही दिवसांपूर्वी या रुग्णालयातून हलवलेल्या कोरोनाबाधित वृद्धाच्या संपर्कात आली होती. हा वृद्ध उपचारादरम्यान मेडिकलमध्ये दगावला. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून वृद्धाच्या संपर्कात आलेल्या खासगी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्याच्या चाचण्या केल्या. त्यात एक परिचारिका बाधित आढळली. खासगी रुग्णालयात खळबळ उडाली होती. मात्र, प्रशासनाने तातडीने परिचारिकेला उपचारासाठी मेडिकलमध्ये हलवले. तर 66 आरोग्य कर्मचाऱ्यांना याच खासगी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, खबरदारीचे सर्व उपाय या खासगी रुग्णालयात घेण्यात येत असल्याचा दावा रुग्णालय संचालकांनी केला आहे. 

उपराजधानीतून 389 कोरोनामुक्त 
मागील तीन महिन्यांत कोरोनाबाधितांची एकूण संख्या 577 वर पोहोचली. यापैकी 389 रुग्ण बरे झाले आहेत. तर 174 कोरोनाबाधित उपराजधानीतील विविध कोविड रुग्णालयांत दाखल आहेत. यापैकी मेयो 72, मेडिकलमध्ये 82 तर आणि एम्समध्ये 20 कोरोनाबाधित दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर येथे उपचार सुरू आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com