ॲड. आंबेडकर म्हणाले, तीन दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन 

राज्य शासन कमकुवत आहे, पण केंद्र सरकार त्याहून अधिक कमकुवत आहे. केंद्रात व राज्यात राजकीय नेतृत्वच नाही. जे काही नेतृत्व आहे, ते जातीचे व धर्माचे नेतृत्व आहे. निर्णय होत नाहीत. कोरोना कमी करण्याऐवजी कुणाचेही तरी आदेशच फक्त पाळले जात आहेत.
vanchit
vanchit

नागपूर : सिताबर्डीच्या मोर भवनसमोर डफली वाजवून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बस वाहतूक सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. याबाबत १५ आॅगस्टपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही ॲड. आंबेडकर यांनी दिला. 

यावेळी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, कोरोनाची लागण झाली. १० दिवसापूर्वी केंद्राने सादर केलेल्या रिपोर्टनुसार ८० टक्के रुग्णांमध्ये अ‍ॅन्टीबॉडीज निर्माण झाल्यात. त्यामुळे त्यांना कोरोना लागण होणार नाही. उरलेल्या २० पैकी १५ टक्क्यांमध्ये अ‍ॅन्टीबॉडीज निर्माण होत आहेत. ५ टक्के लोकांसाठी ९५ टक्के लोकांना वेठीस का धरले जात आहे. हा मुख्य प्रश्न आहे. राज्यात अनेक भागांत खासगी ट्रान्सपोर्ट सुरू आहे. मग शासकीय ट्रान्सपोर्ट का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ऑड-इव्हनमुळे कोरोना थांबलेला नाही. त्यामुळे सर्व दिवस दुकाने सुरू ठेवून उपाययोजना कराव्यात. व्यापाऱ्यांनीही आता पुढाकार घ्यावा. त्यांनी निर्णय घेतला तर सरकारही काही करू शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राज्य शासन कमकुवत आहे, पण केंद्र सरकार त्याहून अधिक कमकुवत आहे. केंद्रात व राज्यात राजकीय नेतृत्वच नाही. जे काही नेतृत्व आहे, ते जातीचे व धर्माचे नेतृत्व आहे. निर्णय होत नाहीत. कोरोना कमी करण्याऐवजी कुणाचेही तरी आदेशच फक्त पाळले जात आहेत, अशी टीकाही अ‍ॅड. आंबेडकर यांनी केली. आंदोलनात राजू लोखंडे, रवी शेंडे, राहुल वानखेडे, रमेश पिसे, नितेश जंगले, डॉ. रमेश गजबे, विलास वाटकर, राजेश जंगले, सुमेध गोंडाणे, सिद्धांत पाटील, सुनील इंगळे अंकुश मोहिले, वनमाला उके, वर्षा बन्सोड, सुजाता सुरडकर आदींसोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

१५ ऑगस्टनंतर तीव्र आंदोलन 
राज्यातील सार्वजनिक बस सेवा सुरू करण्यासोबतच व्यापारी, टपरी, फेरीवाले, दुकानदार यांना जगू द्या. त्यांच्यावर कारवाई करू नका. १५ ऑगस्टपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा प्रत्येक जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.    (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com