एसीबी घेणार डॉ. गंटावारच्या लॉकरची झडती, कोट्यवधींच्या संपत्तीचे दस्तऐवज जप्त 

गुन्हा दाखल होताच एसीबीच्या पथकाने गंटावार यांच्या रामदासपेठेतील फ्लॅट व कोलंबिया हॉस्पिटलची झडती घेतली. फ्लॅटच्या झडतीदरम्यान पथकाला हॉस्पिटलच्या जागेची सात कोटी रुपये किमतीची रजिस्ट्री, 2013 मध्ये 90 लाख रुपयांना घेतलेल्या फ्लॅटची रजिस्ट्री तसेच अन्य एका व्यक्तीच्या नावे असलेल्या भूखंडाचे दस्तऐवज आढळले.
nmc-nagpur
nmc-nagpur

नागपूर : महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण मधुकर गंटावार व त्यांची पत्नी शिलू प्रवीण गंटावार यांच्या विरोधात बेहीशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापूर्वीच महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांना निबंबित करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. पण आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांचे निलंबन करण्यास नकार दिला आहे. हा विषय महानगरपालिका वर्तुळात चांगलाच गाजतो आहे. त्यांच्या फ्लॅटच्या झडतीदरम्यान एसीबीच्या पथकाला कोट्यवधींच्या संपत्तीचे दस्तऐवज आढळले. पोलिसांनी हे दस्तऐवज जप्त केले आहेत. 

गैरमार्गाने अडीच कोटींची मालमत्ता जमविल्याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ. गंटावार दाम्पत्याविरुद्ध सीताबर्डी पोलिस ठाण्यात बुधवारी अपसंपदेचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच एसीबीच्या पथकाने गंटावार यांच्या रामदासपेठेतील फ्लॅट व कोलंबिया हॉस्पिटलची झडती घेतली. फ्लॅटच्या झडतीदरम्यान पथकाला हॉस्पिटलच्या जागेची सात कोटी रुपये किमतीची रजिस्ट्री, 2013 मध्ये 90 लाख रुपयांना घेतलेल्या फ्लॅटची रजिस्ट्री तसेच अन्य एका व्यक्तीच्या नावे असलेल्या भूखंडाचे दस्तऐवज आढळले. 

दरम्यान, डॉ. गंटावार यांचे एलआयसी चौकातील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियात दोन लॉकर असल्याची माहिती एसीबीच्या पथकाला मिळाली. लॉकरची झडती घेण्यासाठी एसीबीच्या पथकाने गंटावार यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. मात्र, गंटावार यांच्याशी त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. काल डॉ. गंटावार यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने डॉ. गंटावार दाम्पत्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com