पदवीधर उमेदवाराच्या पोस्टर्सवरून प्रकाश जावडेकर गायब !

फेब्रुवारी २०२२ मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक आहे. पक्षातील या प्रकारच्या व्यवस्थेचा फटका पुणे व पिंपरी महापालिकेत बसू नये, याची काळजी पक्षाच्या नेतृत्वाने आतापासूनच घ्यायला हवी, अशी प्रामाणिक भूमिका काही कार्यकर्ते खासगीत व्यक्त करू लागले आहेत.
Prakash Jawadekar
Prakash Jawadekar

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्यावतीने संग्राम देशमुखांच्या उमेदवारीची पोस्टर्स पुण्यात सर्वत्र झळकत आहेत. प्रिंट आणि डिजीटल अशा दोन्ही माध्यमात जाहिराती येत आहेत. मात्र, ज्यांनी या मतदारसंघाचे भाजपाकडून दोनवेळा नेतृत्व केले ते केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर प्रचार यंत्रणा आणि जाहिरातीतून गायब आहेत. त्यांना कुठेच का स्थान देण्यात येत नाही, या बाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.  

संग्राम देशमुखांना निवडून देण्यासाठी झळकणाऱ्या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ व शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना क्रमाने राजकीय ‘प्रोटोकॉल’प्रमाणे स्थान देण्यात आले आहे. मात्र, या साऱ्यात केंद्रीय मंत्री असलेल्या जावडेकर यांना कुठेच स्थान नाही. दिवाळीच्या काळात जावडेकर पुण्यात होते. मात्र, या काळात जावडेकर यांना या निवडणुकीच्या कोणत्याही बैठकीत वा प्रचारात सहभागी करून घेण्यात आले नसल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. पदवीधर मतदारसंघाच्या गेल्या दोन टर्म म्हणजे बारा वर्षे चंद्रकांत पाटील हे विधान परिषदेवर आमदार होते. त्याआधी १९८९ ते २००१ या काळात प्रकाश जावडेकर दोन टर्म निवडून आले होते. मात्र, त्याच जावडेकरांना सध्याच्या यंत्रणेत कोणतेही स्थान देण्यात आलेले नाही.

फेब्रुवारी २०२२ मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक आहे. पक्षातील या प्रकारच्या व्यवस्थेचा फटका पुणे व पिंपरी महापालिकेत बसू नये, याची काळजी पक्षाच्या नेतृत्वाने आतापासूनच घ्यायला हवी, अशी प्रामाणिक भूमिका काही कार्यकर्ते खासगीत व्यक्त करू लागले आहेत. लोकांमध्यल्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेऊन दरबारी लोकांना नेते बनविण्याचे धोरण पक्षाने तातडीने बदलायला हवे, अशी भूमिकादेखील हे कार्यकर्ते मांडू लागले आहेत. भाजपाचे कार्यकते असल्याने ते उघडपणे अजूनतरी बोलत नाहीत. मात्र, पक्षनेतृत्वाने आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा. अन्यथा येत्या महापालिका निवडणुकीत पक्षाला सत्ता गमावण्याची वेळ येईल, अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.

(Edited by : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com