असे काय घडले चंद्रपुरात की, राज ठाकरे विजय वडेट्टीवारांशी बोलणार !

त्यांच्या दहशती समोर कुणाची "ब्र' काढण्याची हिंमत होत नाही. मात्र, सोमवारच्या घटनेने लोकांचा संयम सुटला. त्यांच्या मदतीला या परिसरातील सर्वपक्षीय नगरसेवक पुढे आले आहे. आता या नगरसेवकांनी शेट्टी टोळी विरोधात जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली.
Raj Thackeray - Sachin Bhoyar
Raj Thackeray - Sachin Bhoyar

नागपूर : चंद्रपूर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक सचिन भोयर यांना शहरातील मद्रासी नागरिकांकडून धमक्या मिळत आहेत. ही बाब भोयर यांनी राज ठाकरे यांना सांगितली. त्यावर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांशी मी बोलतो, असे राज ठाकरे यांनी भोयर यांना सांगितले. भोयर आणि ठाकरे यांच्या संभाषणाची आॅडिओ क्लिप सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.

सचिन भोयर हे बंगाली कॅम्प परीसराचे नगरसेवक आहेत. मद्रासी लोकांनी येथे टोळी तयार केली आहे. ‘शेट्टी टोळी’ नावाची दहशत पसरविली जात आहे. या टोळीने झोपडपट्टी परिसरात उच्छाद मांडला आहे. त्यामुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. या प्रकाराची तक्रार सात नगरसेवकांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. त्यामध्ये सचिन भोयरही आहेत. भोयर यांनी राज ठाकरेना ही बाब सांगितल्यानंतर त्यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले. त्यानंतर भोयर पालकमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या टोळीच्या उच्छादापासून झोपडपट्टी परिसरातील नागरिकांची सुटका होईल, अशी अपेक्षा केली जात आहे.  

सर्व सात नगरसेवकांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली असून शेट्टी टोळीच्या मुसक्‍या आवळण्याची मागणी केली आहे. शहरातील इंदिरानगर, श्‍यामनगर, रयतवारी परिसरातील झोपडपट्टीत मजूर वर्ग राहतो. याच भागात आंध्र प्रदेश, तेलंगणातील गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसांनीही निवारा शोधला आहे. यातील काहींचे अवैध धंदे आहे. विशेषत "शेट्टी' या आडनावाच्या माणसांचा गुन्हेगारी वर्तुळात चांगलाच दबदबा आहे. चोरी, लुटमार, नागरिकांना मारहाण, दारूचा अवैध व्यवसाय त्यांच्याकडून राजरोसपणे सुरू आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्याला ते मारहाण करतात. घरावर शस्त्रांसह चालून जातात. त्यामुळे या भागातील लोकं त्यांच्या वाटेला फारशी जात नाही. त्यामुळे या टोळीची हिंमत वाढली आहे. 

अमली पदार्थांच्या नशेत ते लोकांना मारझोड करतात. या टोळीत महिलांचाही समावेश आहे. तक्रारकर्त्याच्या घरावर या महिला चालून जातात. मारहाण करतात आणि विनयभंग झाल्याची तक्रारही स्वतःच करतात. दोन दिवसांपूर्वी राहुल कोरे नामक युवक कामावरून घरी येताना शेट्टी टोळीच्या लोकांनी त्याला मारहाण केली. त्याने त्यावेळी प्रतिकार केला. त्यानंतर सोमवारी टोळीने त्याच्यावर हल्ला केला. वेळीच वॉर्डातील नागरिक कोरे कुटुंबीयांच्या मदतीला धावून आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या टोळी संदर्भात यापूर्वी अनेकदा पोलिसांत तक्रारी करण्यात आल्या. पोलिसांनी कारवाई केली. मात्र, तुरुंगातून सुटल्यानंतर या टोळीच्या लोकांनी तक्रारकर्त्यालाच मारहाण केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. 

त्यांच्या दहशती समोर कुणाची "ब्र' काढण्याची हिंमत होत नाही. मात्र, सोमवारच्या घटनेने लोकांचा संयम सुटला. त्यांच्या मदतीला या परिसरातील सर्वपक्षीय नगरसेवक पुढे आले आहे. आता या नगरसेवकांनी शेट्टी टोळी विरोधात जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. मनसेचे नगरसेवक सचिन भोयर, कॉंग्रेसचे अमजद अली, संगीता भोयर, अपक्ष अजय सरकार, भाजपचे चंद्रकला सोमाय, वंदना जांभूळकर, जयश्री जुमडे यांनी या शेट्टी टोळीच्या मुसक्‍या आवळण्याची मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com