तेव्हा यशोमतीताईंच्या मनात संविधान नव्हते का? : शिवराय कुळकर्णी - was not there a constitution in yashomatitais mind then asked shivrai kulkarni | Politics Marathi News - Sarkarnama

तेव्हा यशोमतीताईंच्या मनात संविधान नव्हते का? : शिवराय कुळकर्णी

अतुल मेहेरे
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

आज भारतीय जनता प्रश्‍न महिला मोर्चाच्या वतीने दिवसभर धरणे आंदोलन करून पालकमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. उद्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यशोमती ठाकूर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा नाहीतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना आपल्या सरकारमधून बरखास्त करावे.

नागपूर : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना काल जिल्हा न्यायालयाने तीन महिने कारावास आणि १५ हजार ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आपले कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला त्यांनी भर रस्त्यावर झापड मारली होती. आपल्या भाषणांमध्ये नेहमी संविधानाचा उल्लेख करणाऱ्या यशोमतीताईंच्या मनात तेव्हा संविधान नव्हते का, असा प्रश्‍न भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी विचारला आहे. 

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज अमरावतीच्या राजकमल चौकात धरणे आंदोलन केले आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी करीत, नारेबाजी केली. श्री कुळकर्णी म्हणाले, असे गुंड प्रवृत्तीचे हाणामारी करणारे लोक जर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असतील, तर त्यांच्याकडून राज्यातील जनतेने न्याय मिळण्याची अपेक्षा कशी करायची. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री कर्मचाऱ्याला घरी बोलावून बेदम मारहाण करतो. एक मंत्री मारहाणीच्या प्रकरणात दोषी सिद्ध झाल्या आहेत आणि न्यायालयाने त्यांना शिक्षादेखील ठोठावली आहे. त्यामुळे हे लोक महाराष्ट्र कसा वाचवतील हा प्रश्‍न जनतेच्या मनात आहे. 

आज भारतीय जनता प्रश्‍न महिला मोर्चाच्या वतीने दिवसभर धरणे आंदोलन करून पालकमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. उद्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यशोमती ठाकूर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा नाहीतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना आपल्या सरकारमधून बरखास्त करावे, अशी मागणी आम्ही लावून धरणार असल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी सांगितले. या विषयात भाजप आक्रमक झाली असून उद्यापासून हे प्रकरण चांगलेच पेट घेणार, असे एकंदरीत चित्र आज झालेल्या घडामोडींवरून दिसत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख