खासदार क्रीडा महोत्सवासाठी तेंडुलकर आणि गडकरींनी केले संदीप जोशींचे कौतुक ! - tendulkar and gadkari praise sandeep Joshi for mp sports festival | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

खासदार क्रीडा महोत्सवासाठी तेंडुलकर आणि गडकरींनी केले संदीप जोशींचे कौतुक !

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

खासदार महोत्सव संपूर्ण देशात गाजला. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही त्याची प्रसंशा केली. दोन्ही क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यात मोलाचा वाटा संदीप जोशींचा असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संदीप जोशी यांचे कौतुक केले.

नागपूर : नागपूर शहराने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक करणारे अनेक दर्जेदार खेळाडू दिले आहेत. क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धिबळ, मुष्टियोद्धा, शरीरसौष्ठव, जलतरण, सायकलिंग अशा विविध प्रकारच्या खेळांमध्ये नागपुरातील खेळाडूंनी यश संपादन केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या आणि देशभर लोकप्रिय ठरलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी गडकरींनी पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांच्यावर सोपवली होती. ती त्यांनी लीलया पार पाडली. याबद्दल गडकरींनी संदीप यांचे जाहीरपणे कौतुक केले. विश्‍वविक्रमी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही त्याची प्रसंशा केली. 

मोठ्या स्तरावर जाऊन यश संपादन करणारे हे खेळाडू शहरातील गल्लीबोळात राहणा-या, मैदानात खेळणा-या अनेकांसाठी आदर्श ठरले आहेत. शहरातील तरुणांमध्ये, मुलांमध्ये अनेक कौशल्य आहेत. त्याला योग्य व्यासपीठ मिळाल्यास देशाचा मान उंचावणारे आणखी व्यक्ती तयार होतील. याच विश्वासाच्या भावनेतून नागपूर शहरामध्ये ‘खासदार क्रीडा महोत्सव’ साजरा करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरासह आसपासच्या भागातील अनेक उदयोन्मुख, प्रतिभावंत खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळाले.

नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील देशात आदर्श ठरलेला हा महोत्सव यशस्वी करण्यात संदीप जोशी यांचे महत्वाचे योगदान ठरले. नागपूर शहरात दोनदा आयोजित झालेल्या संपूर्ण खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक म्हणून संदीप जोशी यांनी नितीन गडकरींनी सोपवलेली जबाबदारी लीलया पेलली. प्रत्येक खेळाडूला त्याने निवडलेल्या स्पर्धेत सहभागी होता यावे, त्यासाठी त्याला आवश्यक साहित्य, अन्न पुरविणे यापासून ते क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून शहरातील ओस पडलेली मैदाने क्रीडांगणे म्हणून नावारूपास येणे, इथपर्यंत नितीन गडकरी यांचा दुरदृष्टीकोन होता. तो पहिल्याच प्रयत्नात यशस्वी करून दाखविण्यात संदीप जोशी यांची भूमिका अतिशय मोलाची ठरली.

पहिल्या खासदार क्रीडा महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद आणि यशानंतर अगदी सहा महिन्यांतच दुसरा खासदार क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला. हा महोत्सव संपूर्ण देशात गाजला. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही त्याची प्रसंशा केली. दोन्ही क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यात मोलाचा वाटा संदीप जोशींचा असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संदीप जोशी यांचे कौतुक केले.

(Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख