खासदार व आमदार राणांच्या कुटुंबातील दहा सदस्य कोरोनाबाधित

माझ्या कुटुंबातील सात-आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सर्वांनी या काळात काळजी घेणे आवश्‍यक आहे. सर्वांनी नियमांचे पालन करून आपली काळजी घ्यावी, आपण कोरोनाशी लढूया, असे आमदार रवी राणा म्हणाले.
Navnit Rana-Ravi Rana
Navnit Rana-Ravi Rana

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या कुटुंबातील एकूण दहा सदस्य पॉझिटिव्ह आढळले. हा अहवाल येताच चांगलीच खळबल उडाली आहे.

त्यांच्या कुटुंबाशी संबंधित सुमारे 55 जणांचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले होते. त्यात आमदारांच्या वडिलांचा अहवाल काल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आईचासुद्धा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना तातडीने नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, कुटुंबातील व निकटवर्तीय अशा आठ सदस्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू होती. आई, वडील, बहीण, जावई, पुतण्या, दोन भाच्या, दोन मुले व एका अंगरक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आमदारांचे निवासस्थान असलेल्या शंकरनगर परिसराला कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे.

आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्‍यामसुंदर निकम यांनी आमदारांच्या निवासस्थानी भेट देऊन पाहणी केली.

कोरोनाशी लढूया
माझ्या कुटुंबातील सात-आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सर्वांनी या काळात काळजी घेणे आवश्‍यक आहे. सर्वांनी नियमांचे पालन करून आपली काळजी घ्यावी, आपण कोरोनाशी लढूया.
रवी राणा, आमदार, बडनेरा.    (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com