मद्यपी चालकाने माझ्या दादाच्या गाडीला धडक मारावी का? चिमुकलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र.. - should an alcoholic driver hit my brothers vehicle girl students letter to the chief minister | Politics Marathi News - Sarkarnama

मद्यपी चालकाने माझ्या दादाच्या गाडीला धडक मारावी का? चिमुकलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र..

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

या आदिवासी विद्यार्थीनीने म्हटलं, १९६३ मध्ये गडचिरोलीतील गावागावांमध्ये आदिवासी नागरिकांनी आपल्या परंपरेनुसार अनवाणी पायांनी मुंबईला जाऊन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी शरद पवारांना दारुबंदीसाठी सहा वर्षे सुरु असलेल्या आंदोलनांची माहिती दिली आणि आपल्या भावना पोहचवल्या होत्या.

चंद्रपूर : मद्यपी चालकाने माझ्या तेजस दादाच्या गाडीला धडक मारावी का? आणि माझे बाब झिंगुन घरात यावे, हे आदित्य दादांना रुचेल का, असे प्रश्‍न करीत चंद्रपुर जिल्ह्यातील एका आठवीतल्या विद्यार्थिनीने दारूबंदी न उठविण्यासाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवू नये, अशी मागणी या मुलीने भावनिक साद घालून केली आहे. 

सध्या विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या तीन जिल्ह्यांमध्ये दारुमुक्तीच्या लढ्याला व्यापक रुप आलं आहे. काही राजकीय नेत्यांनी या जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्यासाठी प्रयत्न सुरु केल्यानंतर येथील स्थानिक आदिवासी नागरिकांनी याविरोधात लढा पुकारला आहे. याचाच भाग म्हणून चंद्रपूरमधील एका आठवीच्या मुलीने दारुबंदीच्या मुद्द्यावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले आहे. या आठवीच्या मुलीने आपल्या पत्रात म्हटलं आहे, "माझे बाबा झिंगून घरात यावेत हे आदित्य दादांना रुचेल का? 

मद्यपी वाहनचालकाने निरपराध जनतेला चिरडून जावे किंवा माझ्या तेजस दादाच्या गाडीला धडक मारावी या विचारानेही अंग शहारते. आपण सर्व राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वंशज आहोत आणि माँ जगदंबेची ओटी जनतेची कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या करातून आम्ही कशी काय भरणार? माझे बांधव, माता भगिनी आनंदाने सुखाने नांदोत, अशी मागणी आपणच आपले सर्वांचे दैवत पंढरीच्या विठोबांकडे करतो. मग दारुबंदी उठवावी, हा आपल्या मंत्री महोदयांचा अनाठायी आग्रह का असावा? असा सवालही या आदिवासी मुलीने केला आहे.

आदिवासींनी अनवाणी पायांनी मुंबईला जाऊन दारुबंदी केलीय
या आदिवासी विद्यार्थीनीने म्हटलं, १९६३ मध्ये गडचिरोलीतील गावागावांमध्ये आदिवासी नागरिकांनी आपल्या परंपरेनुसार अनवाणी पायांनी मुंबईला जाऊन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी शरद पवारांना दारुबंदीसाठी सहा वर्षे सुरु असलेल्या आंदोलनांची माहिती दिली आणि आपल्या भावना पोहचवल्या होत्या.

आम्ही मुलांच्या चुका झाल्यास बाबा कान पिरगाळतात. शासनाने कायदे करणे आणि स्वनियंत्रण करणे या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कितीही समाजप्रबोधन केले तरीही कित्येक मद्यपी वाट चुकतात. अशांना समुपदेशनासह प्रसंगी कायद्याने योग्य वाट दाखविणे हे आम्हा सर्वांचे कर्तव्यच आहे असे मी मानते, असंही या मुलीने आपल्या पत्रात नमूद केलं.                (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख