लाचखोरीत पुणे नंबर वन, अमरावती विभाग दुसरा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्याची शहानिशा करून दखल घेत तत्काळ कारवाई केली जाते. त्यामुळेच शासकीय कामांसाठी लाच मागणारे व घेणारे त्यांच्या सापळ्यात अडकत आहेत.
Bribe
Bribe

अमरावती : ‘लाचखोरी मिटवण्यासाठी प्रत्येक समाजघटकाने पुढे या, कामासाठी लाच मागणाऱ्याविरुद्ध तक्रार करा’, असे कितीही फलक शासकीय कार्यालयांमध्ये लावले असले तरीही. शासकिय कर्मचारी काही लाच घेतल्याशिवाय काम करीत नाहीत. म्हणायला काही अधिकारी, कर्मचारी आहेतही प्रामाणिक. पण लाचखोरांचाच भरणा अधिक आहे. गेल्या आठ महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणारे आणि स्विकारणाऱ्यांविरुद्ध सर्वाधिक गुन्हे पुणे विभागात दाखल केले. यानंतर अमरावती विभागाचा दुसरा क्रमांक आहे.  

अमरावती विभागाचा विचार केल्यास चालू आठवड्यात अमरावती विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारणाऱ्या ६४ अधिकारी, कर्मचाऱ्यांसह काही खासगी व्यक्तींना रंगेहाथ पकडले. त्यात अमरावती १८, अकोला १२, यवतमाळ ११, बुलडाणा ११ आणि वाशिम १० या व्यतिरिक्त नुकत्याच तीन कारवायांची त्यात वाढ झाली आहे. त्यामध्ये वर्ग एकचे आठ, वर्ग दोनचे सहा, वर्ग तीनचे सर्वाधिक ५१, वर्ग चारचा एक, इतर ४ आणि खासगी व्यक्ती १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. त्यात पोलिस खात्यातील अठरा, महसूलच्या चौदा, पंचायत समितीच्या सात, वनविभागाच्या पाच जणांचा समावेश आहे. 

राज्यातील इतर विभागाचा विचार केल्यास पुणे विभागात १०१, अमरावती विभागात ६४, नाशिक मध्ये ६०, नागपूर विभाग ५७, औरंगाबाद विभाग ५२, नांदेड विभाग ४९, ठाणे विभागात २९ तर, मुंबई विभागात दहा लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले. १ जानेवारी ते १० ऑगस्ट या काळातील ए.सी.बी.ने रचलेले हे सापळे आहेत. 

तक्रारीनंतर तातडीने होते कारवाई 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्याची शहानिशा करून दखल घेत तत्काळ कारवाई केली जाते. त्यामुळेच शासकीय कामांसाठी लाच मागणारे व घेणारे त्यांच्या सापळ्यात अडकत आहेत. 

शासकीय कार्यालयांत काम करण्यासाठी कुणी लाच मागत असेल तर, अशांविरुद्ध तातडीने तक्रार करावी. तक्रारकर्त्याचे नाव गोपनीय ठेवून कारवाई केली जाते. त्यामुळे प्रत्येक समाज घटकाने पुढाकार घ्यावा. 
- श्रीकांत धिवरे, अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती.          (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com