महापौर म्हणाले, संघटित लढ्यासाठी स्कूल व्हॅनला बनवा ॲम्बुलन्स !

गेल्या अनेक महिन्यांपासून बेरोजगारीचा सामना करणाऱ्या व्हॅन चालक-मालकांना रोजगार उपलब्ध होईल, याकडेही पत्रातून जोशी यांनी लक्ष वेधले. सूचनेची सकारात्मक दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी या सूचनेबद्दल अनुकूलता दर्शविली आहे.
Sandeep Joshi
Sandeep Joshi

नागपूर : केवळ ॲम्बुलन्स वेळेत मिळाली नाही म्हणून नुकताच एका तरुण पत्रकाराचा मृत्यू झाला. ही वेळ पत्रकारच काय पण कुणावरही येऊ नये, म्हणून सद्यःस्थितीत बंद असलेल्या स्कूल बसमध्ये तात्पुरते किरकोळ बदल करून ॲम्बुलन्समध्ये रूपांतरित कराव्या, अशी सूचना महापौर संदीप जोशी यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना केली आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे लवकरच स्कूल बसचे रूपांतर ॲम्बुलन्समध्ये होणार आहे. 

लक्षणे नसल्याने घरीच उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या समुपदेशनासाठी जोशी यांनी डॉक्टर्सही उपलब्ध करून दिले. शहरात सद्यःस्थितीत महापालिकेच्या ४० ॲम्बुलन्स आहेत. सध्या शाळा बंद असून स्कूल व्हॅन उपयोगात नाहीत. या स्कूल व्हॅनमध्ये किरकोळ बदल करून त्याचे रुग्णवाहिकेत रूपांतर केल्यास रुग्णांसाठी ते सोयीचे होईल. अशा स्कूल व्हॅनचे रुग्णवाहिकेत रूपांतर करण्यात यावे, असे आवाहन जोशी यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना केले आहे. कोरोनाशी संघटित लढा देण्यासाठी स्कूल व्हॅनमध्ये किरकोळ बदल करून त्याचे रुग्णवाहिकेत रूपांतर झाल्यास अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी तातडीची सेवा मिळू शकेल. 

गेल्या अनेक महिन्यांपासून बेरोजगारीचा सामना करणाऱ्या व्हॅन चालक-मालकांना रोजगार उपलब्ध होईल, याकडेही पत्रातून जोशी यांनी लक्ष वेधले. सूचनेची सकारात्मक दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी या सूचनेबद्दल अनुकूलता दर्शविली आहे. लक्षणे नसलेले कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. त्यांच्या समुपदेशनासाठी मनपा व आयएमएने पुढाकार घेतला. समुपदेशन पूर्णपणे नि:शुल्क असून डॉक्टरांना फोन करून लाभ घ्यावा, असे आवाहन जोशी यांनी केले. 

फेसबुक लाइव्हद्वारे बाधितांचे समाधान 
महापालिका व आयएमएने फेसबुक लाइव्हद्वारे गृहविलगीकरणातील रुग्णांच्या समाधानासाठी पाऊल उचलले आहे. आजपासून दुपारी २ ते ३ वेळेत हा उपक्रम दररोज सुरू राहील. प्रत्येक दिवशी वेगवेगळे डॉक्टर्स ‘कोविड संवाद’च्या माध्यमातून मनपाच्या अधिकृत फेसबुक पेजवर लाइव्ह येतील. आज अमेय हॉस्पिटलचे डॉ. आनंद काटे आणि कोठारी हॉस्पिटलच्या डॉ. अर्चना कोठारी उत्तरे देतील. 

समुपदेशन करणारे डॉक्टर व त्यांचे क्रमांक 
डॉक्टर मोबाईल क्रमांक समुपदेशनाची वेळ 
डॉ. कुंदा तायडे ९३७३१०६२०९ सायं. ६ ते ८ पर्यंत 
डॉ. मनमोहन राठी ९८२२७२२५६९ दुपारी ४ ते सायं. ७ 
डॉ. विजया बालपांडे ९३७३२८४६९९ दुपारी ४ ते सायं. ७ 
डॉ. अन्नपूर्णा चौधरी ९८२३१२८२७७ दुपारी २ ते ४ 
डॉ. मलानी ९७३००३१०३३ दुपारी २ ते सायं. ६ 
डॉ. किशोर माने ९९२१६२८१८२ दुपारी ३ ते सायं. ५ 
डॉ. अर्जुन भोजवानी ९३२६९८४३२१ सकाळी १० ते दु. १ 
डॉ. विजया बालपांडे ९३७३२८४६९९ दुपारी ४ ते सायं. 
डॉ. किशोर माने ९९२१६२८१८२ दुपारी ३ ते ५ 
डॉ. वंदना काटे ९८२२५६०४३१ सायं. ७ ते ८ 
डॉ. वाय. एस. देशपांडे ९८२३०८३८४१ सायं. ६ ते ८ 
डॉ. दिवाकर भोयर ९३७३१०५३७० सकाळी ९ ते दु. १ आणि सायं. ६ ते ९ 
डॉ. अर्चना देशपांडे ९८२२५७२१७१ दुपारी १२ ते २ 
डॉ. सौरभ बरडे ९८२२६४१२२० सकाळी ८ ते रात्री १०        (Edited By : Atul Mehere)
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com