कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारासाठी विद्युत शहवावाहीनी लावा : बाळू धानोरकर

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या शवदाहिनी लावण्यात आल्या आहेत. चंद्रपुर वाढत्या लोकसंख्येचे शहर असल्याने याचा फायदा कोरोना आपात्कालीन काळात आणि ईतर वेळीही होणार आहे. मरणोपरांत देहाची विटंबना होवू नये, नातेवाईक व प्रशासनाला त्रास होवू नये.
Balu Dhanorkar
Balu Dhanorkar

नागपूर : कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. दररोज दोन आणि कधी कधी त्यापेक्षाही जास्त लोक मृत्यूमुखी पडत आहे. कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतील व्यवस्था अपुरी पडत आहे. यंत्रणेला अडचणी येत आहेत. त्यामुळे शहरात विद्युत आणि एलपीजी शवदाहीनी लावावी, अशी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांना केली आहे. 

कोरोना विषाणुचे लोन शहरात व ग्रामीण भागात पसरले आहे. चंद्रपुर शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मृत्यूची संख्या वाढत असल्याने मृतांच्या अंत्यसंस्कार विधीकरीता असलेल्या स्मशानभुमीत व्यवस्था अपुरी पडत आहे. अशा परीस्थितीत बरेचदा अंत्यविधी पार पाडायला अडचण होते, विलंब होतो. कोरोना बाधितांच्या वाढत्या मृत्यूमुळे अंत्यविधी करताना घ्यावी लागणारी विशेष काळजी व ऊपाययोजना याचा नातेवाइकांसह प्रशासनाला देखील त्रास होत आहे. प्रशासनासमोर बरेचदा या आपात्कालीन परीस्थितीला सामोरे जाण्यासाठी अडचणी येतात. अंत्यसंस्काराला विलंब होत असल्याने मृतदेहाची विटंबना होत असल्याच्या तक्रारी येत असतात. त्यामुळे शहरात विदयुत आणि एलपीजी शवदाहिनी लावण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.
 

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये उपचार घेत असताना कोरोना बाधितांचे मृत्यूदेखील होत आहेत. महानगर पालिका प्रशासनातर्फे मृतदेहावर अंत्यसंस्कार  करण्यात येतात. त्यामुळे विदयुत, एलपीजी शवदाहिनी शहरात लावल्यामुळे अंत्यविधी करताना निर्माण होणारे अनेक प्रश्न सुटणार आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या शवदाहिनी लावण्यात आल्या आहेत. चंद्रपुर वाढत्या लोकसंख्येचे शहर असल्याने याचा फायदा कोरोना आपात्कालीन काळात आणि ईतर वेळीही होणार आहे. मरणोपरांत देहाची विटंबना होवू नये, नातेवाईक व प्रशासनाला त्रास होवू नये, असे खासदार बाळू धानोरकर यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com