धास्ती कोरोनाची; पोलिसांनी किरकोळ गुन्ह्यांमधील आरोपींची धरपकड थांबवली !

वरिष्ठ पोलिस अधिकारी कोरोना होऊ नये म्हणून फिल्डच्या दूर राहतात. अनेक कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये बेडही उपलब्ध होत नाही. नुकताच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना स्वतः दखल घ्यावी लागली. तेव्हा चार कोरोना बाधित पोलिस कर्मचाऱ्यांना बेड उपलब्ध झाले होते.
police logo
police logo

नागपूरः पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरुवातीला नाही, पण आता मात्र त्याची धास्ती पोलिसांनी घेतली आहे. फक्त गंभीर गुन्ह्यांकडे लक्ष केंद्रित केले असून किरकोळ गुन्ह्यांमधील आरोपींची धरपकड थांबविली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून वाढत्या कोरोनाच्या प्रकोपामुळे राज्य पोलिस दलाच्या कार्यशैलीत बदल झाला आहे. गुन्ह्यात अटक केलेले अनेक आरोपी कोरोनाबाधित निघाल्याने शेकडो पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिस दलातही कोरोनाबद्दल धास्ती वाढली आहे. 

तब्बल १ लाख ९६ हजार संख्याबळ असलेल्या महाराष्ट्र पोलिस दलात कोरोना बाधित पोलिस कर्मचाऱ्यांची संख्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढतो आहे. आतापर्यंत जवळपास १७६ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. तसेच राज्यातील ८ ते १० हजार पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. जवळपास सर्वच पोलिस ठाण्यात कोरोना पोहोचला आहे. त्यासाठी पोलिसांचा कोरोना कँटोनमेण्ट झोनमध्ये सतत बंदोबस्त लावणे हे मोठे कारण आहे. तसेच गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना पोलिस अटक करतात. त्यानंतर आरोपीचे मेडिकल केल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे कळते. त्यामुळे अटक करण्यापासून ते कोर्टात नेण्यापर्यंत जे जे पोलिस कर्मचारी संपर्कात आले, त्यांना कोरोना चाचणी करावी लागते. त्यामध्ये जवळपास अर्धेअधिक कर्मचारी पॉझिटिव्ह निघतात. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाचा संसर्ग होते. त्यामुळे आता पोलिसांनी आपल्या कार्यशैलीत बदल केला आहे. फक्त गंभीर गुन्ह्याकडे लक्ष केंद्रित केले असून किरकोळ गुन्ह्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. 

कारवाई करा पण येणार नाही 
साहेब सरकारकडून ५० लाख मिळेल हे खरे आहे हो...पण त्यासाठी सर्वप्रथम मरावे लागेल. साहेब मला मरायचे नाही... कुटुंबासह जगायचे आहे. मुलांचे शिक्षण, लग्न आणि त्यांचे भविष्य सावरायचे आहे. त्यामुळे मला सेवेतून निलंबित करा किंवा तुम्हाला वाट्टेल ती कारवाई करा. पण मी ड्युटीवर येणार नाही, अशाप्रकारचा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

आरोग्याची काळजी कोण घेणार 
वरिष्ठ पोलिस अधिकारी कोरोना होऊ नये म्हणून फिल्डच्या दूर राहतात. अनेक कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये बेडही उपलब्ध होत नाही. नुकताच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना स्वतः दखल घ्यावी लागली. तेव्हा चार कोरोना बाधित पोलिस कर्मचाऱ्यांना बेड उपलब्ध झाले होते. पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्यानंतर त्यांच्या आरोग्याची काळजी घेताना कुणी दिसत नाही.                  (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com