बेल्यातील साखर कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच ठार

नाशिकच्‍या एका खासगी कंपनीकडे येथील वेल्‍डिंगचे काम आहे. माहिती मिळताच बेला पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. चेंबरवरील मृतदेह काढण्यात आले. गावात वृत्त कळताच जमावाने घटनास्थळी धाव घेतली. कामगारांच्या मृत्यूला प्रशासनाला जबाबदार धरून अजूनही नातेवाईकांनी मृतदेह स्विकारले नसल्याची माहितीआहे.
Purti
Purti

बेला (नागपूर) : खुर्सापारनजिक असलेल्‍या वडगाव येथे मानस ॲग्रो ॲंड इम्‍फ्रा लिमीटेड या कारखान्‍यात दुपारी अडीच वाजताच्‍या सुमारास मोठा स्फोट झाला. यात पाच जणांचा मृत्‍यू झाला. वेल्डींग करत असताना ठिणगी गॅसच्या टाकीत पडून हा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. आमदार राजू पारवे यांनी घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे.

स्‍फोटात ठार झालेल्‍यात मंगेश‍ प्रभाकर नौकरकर (वय२३), वासुदेव विठ्‌ठल लडी (वय३०), प्रफुल्‍ल पांडुरंग मून (वय २५), सचिन प्रकाश वाघामारे (वय२४), लिलाधर वामन शेंडे (वय ३५) यांचा समावेश आहे. मानस ॲग्रेा इम्‍फ्रास्‍ट्रक्‍चर प्रा.लिमिटेड या वडगाव येथे असलेल्‍या साखर कारखान्‍यात इथेनॉल तयार करणाऱ्या युनीट एकमध्‍ये आज दुपारी अडिचच्‍या सुमारास टाकीवर गॅस वेल्‍डींग करीत असताना वेल्‍डींगची ठिणगी गॅसमध्‍ये पडली. त्‍यामुळे गॅसचा स्‍फोट होऊन पाच जण ठार झाले.

नाशिकच्‍या एका खासगी कंपनीकडे येथील वेल्‍डिंगचे काम आहे. माहिती मिळताच बेला पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. चेंबरवरील मृतदेह काढण्यात आले. गावात वृत्त कळताच जमावाने घटनास्थळी धाव घेतली. कामगारांच्या मृत्यूला प्रशासनाला जबाबदार धरून अजूनही नातेवाईकांनी मृतदेह स्विकारले नसल्याची माहिती आहे. आमदार राजू पारवे यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशीची मागणी केली आहे.  (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com