जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, दिलगिरी व्यक्त करतो, पण लोकांची गैरसोय करू नका !

जिल्हाधिकाऱ्यांच्या या विनंतीला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अद्याप तरी प्रतिसाद दिलेला नाही. काल सायंकाळी पालकमंत्री संजय राठोड यांनी सर्व डॉक्टर्सना कामावर पुन्हा रुजू होण्याची विनंती केली होती. पण त्यालाही डॉक्टर्स जुमानले नाही. यामुळे सामान्य लोकांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत.
M D Singh
M D Singh

यवतमाळ :  जिल्हाधिकारी एम. डी. सिंह आणि डॉक्टर्स यांच्यातील वादामुळे जिल्ह्यातील स्थिती बिघडत चालली आहे. कोरोनाच्या चाचण्या बंद झाल्या असून बाधितांना उपचार मिळत नाहीये. आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे आणि डॉक्टर्स जिद्दीला पेटले आहेत. जिल्हाधिकारी सिंह यांनी डॉक्टरांना उद्देशून ‘दिलगिरी व्यक्त करतो, पण आपल्या काम बंद मुळे जनसामान्यांची गैरसोय होऊ नये’, अशी विनंती करणारा एक संदेश जारी केला आहे.

आपल्या संदेशात जिल्हाधिकारी म्हणतात, ‘माझे सर्व डॉक्टर सहकारी बांधवांनो…   आज आपल्या काम बंदचा चौथा दिवस आहे. कोविड १९ ची साथ आल्यापासून आपण सर्वांनी मनापासून लोकसेवा दिली आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे आपण बहुतांश शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाला दूर ठेवू शकलो. तसेच मृत्यूदर देखील कमी ठेवू शकलो. त्यामध्ये आपले मुख्य श्रेय आहे, यात कोणाचेही दुमत नाही. वैयक्तिक हेवे दावे न ठेवता मी नेहमी जनहित समोर ठेवून काम केले आहे. आजपर्यंत आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत मी एकाही डॉक्टर वर कारवाई केली नाही आणि कोणाचे भवितव्य धोक्यात येईल, अशीही कोणतीही लेखी कारवाई केलेली नाही. 

माझा हेतू आणि उद्देश्य हे साफ असून मी नेहमी जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात राहावा, यास प्राधान्य दिले आहे. शासन स्तरावरून वेळोवेळी  येणारे निर्देश काटेकोरपणे पाळले जावे याकरिता कडक भूमिका घेतली असेल इतकेच. आपल्यामधील संवाद व्यवस्थित न झाल्यामुळे आणि सर्वांना असणाऱ्या तणावामुळे गैरसमज झाला असेल याची शक्यता नाकारता येत नाही. या संकटाच्या काळात आपले सर्वांचे महत्त्व वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. सर्व यंत्रणांनी मिळून काम केले तरच आपण एकजुटीने जगावर आलेल्या या भयंकर शत्रूला हरवू शकतो.  
कळत नकळतपणे काही शब्दांमुळे आपल्या भावनांना ठेच पोहोचली असेल तर मी मनापासून त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या काम बंदमुळे जनसामान्यांची गैरसोय होऊ नये, अशी मी आपणास कळकळीची विनंती करतो. आपण सर्वांनी आंदोलन मागे घ्यावे, ही पुनश्च विनंती.’ 

जिल्हाधिकाऱ्यांच्या या विनंतीला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अद्याप तरी प्रतिसाद दिलेला नाही. काल सायंकाळी पालकमंत्री संजय राठोड यांनी सर्व डॉक्टर्सना कामावर पुन्हा रुजू होण्याची विनंती केली होती. पण त्यालाही डॉक्टर्स जुमानले नाही. यामुळे सामान्य लोकांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. कोविड सेंटर बंद, चाचण्या बंद असल्यामुळे पॉझिटिव्ह लोकंही शहरात मुक्तपणे फिरत असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे परिस्थिती दिवसागणिक भीषण होत चालली आहे. परिणामी लोकांकडून न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी सुरू झाली आहे. असे असतानाही डॉक्टर्स जिल्हाधिकाऱ्यांची बदली व्हावी, या मागणीवर ठाम आहेत. 

(Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com