‘सिबिल’ने केले वांदे; सहा हजार शेतकऱ्यांना मिळाले नाही कर्ज

आधार प्रमाणीकरण झालेल्या ७८ हजार ३०४ शेतकऱ्यांच्या खात्यांत ५७९ कोटी रुपयांची कर्जमाफी रक्कम जमा करण्यात आली आहे. एकीकडे कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असून, दुसरीकडे मात्र, "डिफॉल्ट' खात्यांनी शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.
Farmer Vidarbha
Farmer Vidarbha

यवतमाळ : ‘सिबिल स्कोअर’मधून शेतकऱ्यांना वगळावे, अशी मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यापूर्वीच केली आहे. पण त्यावर कार्यवाही झाली नाही. परिणामी जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांकडे इतर कर्जांची थकबाकी असल्याची बाब पुढे आली. ही खाती आता ‘डिफॉल्ट’ करण्यात आली आहे. त्यामुळे कर्जमुक्ती होऊनही या शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळू शकले नाही. 

शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी देण्यात आली. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन खातेही नील झाले. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेनंतर महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांवरील भार कमी होऊन शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांसमोर असलेल्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही. एका मागून एक संकटे कायमच आहेत. कर्जमाफी झाल्यानंतरही जिल्ह्यातील जवळपास सहा हजार शेतकऱ्यांना या नवीन संकटांचा सामना करावा लागत आहे. बॅंकांनी कर्जमाफीची रक्कम दिल्यानंतर नवीन पीककर्ज मंजूर करताना, "सिबिल'मध्ये त्या शेतकऱ्यांची नावे टाकली आहेत. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्यांकडे पीककर्जाव्यतिरिक्त इतर घेतलेल्या कर्जाची रक्कम थकीत असेल, तर अशी खाती डिफॉल्टमध्ये टाकण्यात आली आहे. परिणामी, या शेतकऱ्यांना नवीन पीककर्जासाठी जुने खाते क्लिअर करावे लागणार आहे. 

काही शेतकऱ्यांनी इतर कर्ज घेऊन त्यांची परतफेड केली, तर काहींचे व्याज किंवा अखेरचा हप्ता भरलेला नाही. अशी सर्व खाती "सिबिल'मध्ये आली आहेत. परिणामी या शेतकऱ्यांना नवीन कर्जासाठी आधी जुने क्‍लिअर करावे लागणार आहे. कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यातील ९८ हजार ८१८ शेतकरी कर्जमाफीत पात्र ठरले. त्यांपैकी ८५ हजार १५९ शेतकऱ्यांची यादी बॅंकांना आली. त्यातून आधार प्रमाणीकरण झालेल्या ७८ हजार ३०४ शेतकऱ्यांच्या खात्यांत ५७९ कोटी रुपयांची कर्जमाफी रक्कम जमा करण्यात आली आहे. एकीकडे कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असून, दुसरीकडे मात्र, "डिफॉल्ट' खात्यांनी शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे आता यासंदर्भात काय निर्णय होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

शेतकऱ्यांसाठी सिबिल रद्द करण्याची मागणी 
"सिबिल'मधून शेतकऱ्यांना सूट देण्यात यावी, अशी मागणी दोन दिवसांपूर्वी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे. शेतकऱ्यांना त्यातून सूट देऊन उद्योग व व्यावसायिकांसाठी ही अट कायम ठेवावी, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे. त्यामुळे यासंदर्भात बॅंका काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे आहे.      (Edited By : Atul Mehere) 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com