पणन महासंघात अजितदादा काँग्रेसचा कापूसकोंडा करण्याच्या तयारीत..! - Ajitdada is preparing to make Congress a cotton Konda in the marketing federation ..! | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

पणन महासंघात अजितदादा काँग्रेसचा कापूसकोंडा करण्याच्या तयारीत..!

चेतन देशमुख
शुक्रवार, 25 जून 2021

गेल्या निवडणुकीत काँग्रेसने दोन्ही पद आपल्याकडे ठेवल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी होती. परिणामी आता संख्याबदल झाल्याने राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार हे महत्वाचे ठरणार आहे.

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची निवडणुकीनंतर आघाडी झाली होती. अपक्ष संचालकांच्या मदतीने पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद मिळाले. यानंतर जवळपास दीड वर्षांनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलण्यात आले. अपक्ष संचालकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसचे बहूमत झाले. या जोरावर काँग्रेसने अध्यक्ष, उपाध्यक्ष असे दोन्ही पदे आपल्याकडेच ठेवली. नुकताच प्रसेनजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांची संख्या नऊ झाली असून पणन महासंघातील सत्तासमीकरण बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. Ajitdada is preparing to make Congress a cotton Konda in the marketing federation ..!

कापूस उत्पादक पणन महासंघावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व राहिले आहे. यापूर्वी महासंघाचे अध्यक्षपद सर्वाधिककाळ राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. 2017 मध्ये झालेल्या निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीकडूनच लढविल्या. यात काँग्रेसचे आठ तर राष्ट्रवादी काँग्रेसचेही आठ संचालक निवडून आले. एका जागेवर अपक्ष संचालक सुरेश चिंचोळकर विजयी झाले. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या वेळी अपक्ष संचालक चिंचोळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पसंती दिली. 

हेही वाचा : आता डेल्टा प्लसच्या रूपाने कोरोनाचे आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ नऊ झाल्याने अध्यक्षपद राष्ट्रवादी कडे आले. दोन्ही पक्षात झालेल्या करारानुसार एक-एक वर्षांचा फॉम्युला ठरला. दीड वर्षांनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. यावेळी अपक्ष संचालक सुरेश चिंचोळकर यांचा काँग्रेस प्रवेश झाला. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ नऊ झाले. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी आग्रही होती. मात्र, संख्याबळानुसार अध्यक्ष काँग्रेसचा राहिल असा दावा काँग्रेसने केला. त्यामुळे उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. 

आवश्य वाचा : मध्यरात्रीची गर्दी पाहून पटोले म्हणाले, `तुम्ही खरे काँग्रेसचे सैनिक`

परिणामी दोन्ही पदासाठी काँग्रेसने आपले उमेदवार दिले. दोन वर्षापासून दोन्ही पदे काँग्रेसकडे आहेत. नुकताच बुलडाण्यातील प्रसेनजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी केली. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे बहूमत झाले आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने दोन्ही पद आपल्याकडे ठेवल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी होती. परिणामी आता संख्याबदल झाल्याने राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार हे महत्वाचे ठरणार आहे.

अजितदादांचा निर्णय महत्वाचा...
 
सहकार क्षेत्रावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जबरदस्त पकड आहे. गेल्यावेळी काँग्रेसने घेतल्या भुमीकेमुळे आता दादा काय निर्णय घेणार हे महत्वाचे आहे. विद्यमान अध्यक्ष,उपाध्यक्षांचा एक वर्षांचा कार्यकाळ संपून वर्ष लोटले आहे. त्यामुळे कधीही निवडणुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादीची भुमीका काय असणार यावरच काँग्रेसचे पद अवलबुंन आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख