राऊत साहेब... हे काय केले, खामगावात डॉक्टरने कम्पाऊंडरला केली मारहाण !

‘यापुढे माझ्या हॉस्पिटलमध्ये दिसलास तर जिवाने मारून टाकेल व खोट्या विनयभंगाच्या केसमध्ये तुला अडकवून टाकेल’ अशी धमकी दिल्याचेही विठ्ठलने तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या या धमकीमुळे व मारहाणीमुळे मी व माझे कुटुंबीय अत्यंत घाबरलेलो आहोत.
Ashish Agrawal Buldana
Ashish Agrawal Buldana

बुलडाणा : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी डॉक्टर आणि कम्पाऊंडरबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघत आहे. डॉक्टर आणि कम्पाऊंडरमध्ये वादावादी आणि भानगडी होण्याच्या घटना त्यांच्या वक्तव्यानंतर घडत आहेत. अशीच एक घटना जिल्ह्याच्या खामगाव येथे घडली. डॉक्टरने कम्पाऊंडरला गुंडांकरवी मारहाण केली. कम्पाऊंडरच्या तक्रारीवरून पोलीसांनी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल गेला आहे. 

खामगांव  येथील डॉ. आशिष अग्रवाल यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या विठ्ठल महाले याला डॉ.आशिष अग्रवाल यांनी काही गावगुंडांकरवी मारहाण केली. खामगांव येथील जलंब नाक्यावर मारहाण केल्याची तक्रार विठ्ठल महाले याने पोलीस ठाण्यात दिली आहे. विठ्ठल महालेने दिलेल्या तक्रारीनुसार, डॉ.आशिष अग्रवाल यांनी दिनांक १२ ऑगस्टला विठ्ठलला फोन करुन आपल्या हॉस्पिटलमध्ये बोलावले होते. तेव्हा विठ्ठल खामगावत कामानिमित्त आलेला असल्यामुळे तो लगेच हॉस्पिटलमध्ये गेला. मला कशासाठी बोलावले, असे डॉ. अग्रवाल यांना विचारल्यावर विठ्ठलला चढ्या आवाजात तू माझ्या हॉस्पिटलमध्ये काम का करत नाही, असे विचारले. 

बोलताना डॉ. अग्रवाल यांनी अनेकवेळा शिवीगाळ केली, असेही विठ्ठलने तक्रारीत नमूद गेले आहे. त्यांच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी विठ्ठलला लाथाबुक्क्यांनी पाठीवर, तोंडावर, हातावर मारहाण केली. येवढ्यावच ते थांबले नाही तर पायावर लोखंडी रॉडने मारले. विठ्ठल महालेला गंभीर दुखापत झाल्याने खामगाव सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला अकोला येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

‘यापुढे माझ्या हॉस्पिटलमध्ये दिसलास तर जिवाने मारून टाकेल व खोट्या विनयभंगाच्या केसमध्ये तुला अडकवून टाकेल’ अशी धमकी दिल्याचेही विठ्ठलने तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या या धमकीमुळे व मारहाणीमुळे मी व माझे कुटुंबीय अत्यंत घाबरलेलो आहोत. डॉ. आशिष अग्रवाल यांच्यापासून जीविताला धोका निर्माण झाला आहे. माझ्या जिवाचे बरे वाईट झाले, तर याला सर्वस्वी  डॉ.आशिष अग्रवाल हेच जबाबदार राहतील, असे विठ्ठल महाले याने तक्रारीत म्हटले आहे. विठ्ठलच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ.आशिष अग्रवाल व अन्य दोघांविरुद्ध कलम ३२३, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

एक महिन्याचा पगार शिल्लक
डॉ. अग्रवालने विठ्ठल महालेला एक महिन्याचे वेतनसुद्धा दिलेले नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. डॉ. अग्रवाल हे गुंडगिरी प्रवृत्तीचे असल्याचेही सांगण्यात येते. यापूर्वीसुद्धा त्यांनी असे प्रकार केल्याची माहिती आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास लावलेल्या विलंबाबतही खामगावात उलटसुलट चर्चा होत आहेत.   (Edited By : Atul Mehere) 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com