मॅच फिक्सिंगचा केला होता भांडाफोड, अमितेशकुमार आज स्वीकारणार सूत्र

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा क्रिकेट बेटिंगचा जगभरात गोरखधंदा सांभाळणारा क्रिकेट बुकी मुकेश कोचर हा दुबईतून मॅच फिक्सिंगसाठी वारंवार मर्लोनसोबत संपर्क करत होता. हे लक्षात आल्यामुळे अमितेश कुमार यांनी हे संभाषण टेप करून क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली होती.
CP Amitesh Kumar-IPS
CP Amitesh Kumar-IPS

नागपूर : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह महिला व वृद्धांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात येईल, तसेच सायबर गुन्हेगारांवर अंकुश कसण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले. उद्या ते पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्विकारणार आहेत. वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू मर्लोन सॅम्युअलला ताब्यात घेऊन मॅच फिक्सिंगचा भांडाफोड करणारे धडाकेबाज पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. नागरिकांची सुरक्षा करणे, हे पोलिसांचे असलेले आद्य कर्तव्यच आपण प्राधान्याने बजावणार असल्याचेही ते म्हणाले.

आयुक्तांसाठी नागपूर शहर नवे नाहीत. यापूर्वी ते २००५ ते २००७ अशी दोन वर्षे ते पोलिस उपायुक्त म्हणून त्यांनी कार्य केले आहे. त्यामुळे शहराची खडानखडा त्यांना माहिती आहे. येथील गुन्हेगारांनाही ते ओळखून आहेत. त्यामुळे आत्तापासून अनेक गुन्हेगारांनी धास्ती घेतली आहे. अमितेश कुमार हे मुंबईत राज्य गुप्त वार्ता विभागात सहआयुक्त पदावर कार्यरत होते. त्यांना पदोन्नती देत नागपूर शहराचे पोलिस आयुक्तपद देण्यात आले. अर्थशास्त्र आणि सायबर क्राईममध्ये ते पदव्युत्तर आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते विशेष प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नागपूर शहरातील गुन्हेगारीचा आढावा घेण्यात येईल. 

त्यानुसार गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना आखल्या जातील. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न असेल. अपघाताची संख्या कमी करण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येईल, असे अमितेश कुमार म्हणाले. नागपूर शहरातील गुन्हेगारीचा आढावा घेण्यात येईल. त्यानुसार गुन्हगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना आखल्या जातील. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न असेल. अपघाताची संख्या कमी करण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येईल. नागपूरकरांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

असा केला होता बेटिंगचा भंडाफोड 
नागपुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ हॉटेल प्राईडमध्ये थांबला होता. अष्टपैलू खेळाडू मर्लोन सॅम्युअलला हॉटेल प्राईडच्या लँडलाईनवर वारंवार कॉल येत असल्याचे लक्षात आल्यामुळे तत्कालीन पोलीस उपायुक्त अमितेश कुमार यांनी त्यावर लक्ष केंद्रित केले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा क्रिकेट बेटिंगचा जगभरात गोरखधंदा सांभाळणारा क्रिकेट बुकी मुकेश कोचर हा दुबईतून मॅच फिक्सिंगसाठी वारंवार मर्लोनसोबत संपर्क करत होता. हे लक्षात आल्यामुळे अमितेश कुमार यांनी हे संभाषण टेप करून क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली होती. नागपूर पोलिसांच्या तपासाच्या आधारे आयसीसीने मर्लोन सॅम्युअलवर दोन वर्षाची बंदीही घातली होती. क्रिकेट बेटिंगचा भंडाफोड केल्याबद्दल अमितेश कुमार यांचे सर्वत्र कौतुक झाले होते.          (Edited By : Atul Mehere)
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com