प्रवीण परदेशींचा तुकाराम मुंढेंना धक्का! म्हणाले, तुम्ही सीईओ नव्हतेच ! 

आयुक्त मुंढे यांनी मनपा आयुक्तांची सीईओपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडल्याचे जोशी म्हणाले. या प्रस्तावाला विरोध करीत मतदानाची मागणी केली. मात्र, चेअरमन प्रवीण परदेशीयांनी मतदानाऐवजी प्रत्येकाचे मत जाणून घेण्याचे ठरविले.
Sandip Joshi - Tukaram Mundhe
Sandip Joshi - Tukaram Mundhe

नागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटीच्या संदर्भातील टेंडर, कर्मचाऱ्यांचे निलंबन आणि याशिवाय जी कामे केली ती नियमबाह्य असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी आज सांगितले. नागपूर स्मार्ट ऍन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक आज स्मार्ट सिटीच्या कार्यालयात झाली. यामध्ये अध्यक्ष प्रवीण परदेसी यांनी "तुकाराम मुंढे तुम्ही स्मार्ट सिटीचे सीईओ नव्हतेच', असे म्हणत त्यांना जोरदार धक्का दिला. आजच्या बैठकीनंतर गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या सीईओ पदाच्या वादावर पडदा पडला असून सत्ताधाऱ्यांची ही सरशी असल्याचे मानले जात आहे. 

स्मार्ट सिटी हा प्रकल्प नागपूर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील असल्यामुळे त्याच्या बैठका आणि कामांकडे देखरेख ठेवण्याच्या सूचना मी तुम्हाला "ओरली' केल्या होत्या. तुम्ही जे काही कामे तेथे करुन ठेवली, ते मी तुम्हाला कधीच सांगितलेले नव्हते. अध्यक्षांकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियुक्ती होत नसते. ती संचालक मंडळाच्या बैठकीतच होते, असे अध्यक्ष परदेशी यांनी आयुक्तांना म्हटल्याचे महापौरांनी सांगितले. त्यामुळे नियमांचे काटेकोरपणे पालन करणारे, कर्तव्यकठोर आयुक्त आजच्या बैठकीत सर्वांसमोर खोटे पडले. आयुक्तांनी गेल्या काळात जी कामे केली ती संचालकांनी बैठकीत मांडली आणि जे काही नियमबाह्य आहे, त्याबाबत भारत सरकारच्या अधिकृत व्यक्तिकडून माहिती घेऊन नंतर संचालक मंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल. त्यानंतर जी चुकीची कामे झाली आहेत त्यावर कारवाई करू, असे सांगत महापौरांनी सर्व संचालकांचे आभार मानले. 

स्मार्ट सिटी सीईओपदी नियुक्तीचा प्रस्ताव स्वतःच मांडणारे आयुक्त तुकाराम मुंढेऐवजी डेप्युटी सीईओ महेश मोरोणे यांच्याकडे कार्यभार देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सीईओपदी नियुक्ती झाल्याचे नमुद करीत असलेल्या आयुक्तांना आज स्मार्ट सिटी संचालकांच्या बैठकीत जोरदार धक्का बसला. बैठकीत चेअरमन प्रवीण परदेसी यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाग घेतला. संचालक व महापौर संदीप जोशी, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, बसपा गटनेत्या वैशाली नारनवरे, सेनेच्या नगरसेविका मंगला गवरे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नासुप्र सभापती शीतल उगले, सीए अनिरुद्ध शेनवाई, सीए जयदीप शहा उपस्थित होते. केंद्र सरकारचे दीपक कोचर यांनीही ऑनलाईन भाग घेतला. 

बैठकीनंतर महापौर संदीप जोशी यांनी पत्रकारपरिषदेत संचालक मंडळाच्या बैठकीची माहिती दिली. आयुक्त मुंढे यांनी मनपा आयुक्तांची सीईओपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडल्याचे जोशी म्हणाले. या प्रस्तावाला विरोध करीत मतदानाची मागणी केली. मात्र, चेअरमन प्रवीण परदेसी यांनी मतदानाऐवजी प्रत्येकाचे मत जाणून घेण्याचे ठरविले. सुरुवातीला त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, नासुप्र सभापतींचे मत जाणून घेतले. या तिघांनीही स्मार्ट सिटीच्या "एचआर' धोरणानुसार निर्णय घेण्याचे मत व्यक्त केल्याचे संदीप जोशी म्हणाले. माझ्यासह संदीप जाधव, पिंटू झलके, तानाजी वनवे, वैशाली नारनवरे 'एचआर' धोरणानुसार नवीन पूर्णवेळ सीईओंची नियुक्ती होईस्तोवर डेप्युटी सीईओकडे सीईओपदाचा कार्यभार द्यावा, अशी मागणी केली. यावरून सर्वानुमते डेप्युटी सीईओ महेश मोरोणे यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले. वित्त व लेखा अधिकारीपदासाठी जाहिरात काढण्याचा निर्णय झाल्याचेही महापौरांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com