जि.प. शिक्षकांच्या आई-वडिलांसाठी गुड न्यूज ! आज झाला मोठा निर्णय - Z.P. Good news for teachers' parents! Today was a big decision | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

जि.प. शिक्षकांच्या आई-वडिलांसाठी गुड न्यूज ! आज झाला मोठा निर्णय

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

लातूर जिल्हा परिषदेत अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे. आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात येते. अशाच प्रकारचा निर्णय नगरमध्येही व्हावा, अशी सूचना काही सदस्यांनी केली.

नगर : जिल्हा परिषदेच्या सभेत आज झालेल्या निर्णयांपैकी शिक्षकांबाबत झालेल्या निर्णयाची विशेष चर्चा रंगली. आपल्या आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या शिक्षकांच्या पगारातून थेट 30 टक्के कपात करण्याचा ठराव आजच्या सभेत घेण्यात आला. 

आई-वडिलांना अनेक शिक्षक सांभाळात नसल्याबाबत गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्हा परिषदेत चर्चा सुरू होती. याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही होत होती. यापूर्वी दहा नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेची सभा होणार होती, तथापि, आॅनलाईन विरोधकांच्या भूमिकेमुळे ही सभा होऊ शकली नाही. ती सभा आज घेण्यात आली. अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर तसेच सर्व सभापती, गटनेते यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

लातूर जिल्हा परिषदेत अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे. आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात येते. अशाच प्रकारचा निर्णय नगरमध्येही व्हावा, अशी सूचना काही सदस्यांनी केली. त्यावर चर्चा झाली. त्यानुसार सर्वानुमते हा ठराव करण्यात आला. आई-वडिलांना शिक्षक सांभाळत नसतील, व तसे निदर्शनास आल्यास त्यांच्या वेतनातून 30 टक्के रक्कम कपात करून आई-वडिलांना देण्यात येईल, असा ठराव मंजूर करण्यात आला. 

आज झालेल्या ठरावाचा प्रस्ताव शासनास पाठविला जाणार आहे. त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. अशा प्रकारचा निर्णय होण्यासाठी काही सदस्यांनी यापूर्वीच मागणी केली होती. हा निर्णय झाल्याने अनेक शिक्षकांच्या आई-वडिलांना दिलासा मिळणार आहे.

या निर्णयाचा महाराष्ट्रातून कित्ता गिरविला जाऊ शकतो. महाराष्ट्रातील इतर जिल्हा परिषदेतही अशा पद्धतीचे निर्णय होतील, अशी शक्यता व्यक्त होत असून, या निर्णयाची राज्यात चर्चा सुरू झाली आहे.

सभेचा अजेंडा उशिरा का

जिल्हा परिषदेच्या सभेचा अजेंडा सदस्यांना उशिरा मिळाला, याबाबत काही सदस्यांनी अक्षेप घेतला. सभेच्या प्रारंभीच याबाबत काही सदस्यांनी आवाज उठविला. यापुढे अजेंडा वेळेत मिळेल, असे प्रशासनाने सांगितल्यानंतर पुढील सभा सुरू होऊ शकली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख