भाजपचा हा बालेकिल्ला फोडण्याची युवक काॅंग्रेसची तयारी - Youth Congress is preparing to demolish this stronghold of BJP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

भाजपचा हा बालेकिल्ला फोडण्याची युवक काॅंग्रेसची तयारी

मुरलीधर कराळे
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

महसूलमंत्री तथा काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली युवक, विद्यार्थी संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे.

नगर : युवक काॅंग्रेसच्या संघटनबांधणीसाठी युवक काॅंग्रेसचे कार्यकर्ते कामाला लागले असून, शिर्डी विधानसभा मतदारसंघात बैठक घेऊन भाजपचा बालेकिल्ला फोडण्याची तयारी या युवकांनी बैठकित चर्चा केली.

महसूलमंत्री तथा काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली युवक, विद्यार्थी संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे. 

शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी नुकताच दाैरा करून विविध ठिकाणी बैठका घेतल्या. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. युवा फळीला मजबुत करून मैदानात उतरविण्यासाठी प्रयत्न करण्याचे सुतोवाच या बैठकांमध्ये करण्यात आले. युवक काॅग्रेसचे जिल्हा समन्वयक किरण काळे यांच्यासह युवक जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा यांनी दाैरा केला. या बैठकीला शिर्डी मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश थोरात, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब बोठे, राहाता समन्वयक राजेंद्र बोरुडे,आदी उपस्थित होते. 

या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना किरण काळे म्हणाले, की शिर्डी मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडे उमेदवार होता. परंतु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काहींनी अचानक भाजपमध्ये उडी मारल्यामुळे पक्षात जागा रिकामी झाली. ऐनवेळी पक्षाने सुरेश थोरात यांना उमेदवारी दिली. परंतु थोरात डगमगले नाहीत. निर्भीडपणे निवडणुकीला सामोरे गेले. वाडीवस्तीवर जात प्रचार केला. थोरात यांनी मोठ्या संख्येने मतदान घेतले. आज ज्या पद्धतीने युवक या ठिकाणी एकत्र जमले आहेत ही आगामी काळातील बदलाची नांदी आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख