`तू आत्ताच हेलिकाॅप्टरमधून फिरतोस, निवडून कसा येणार !` विखे पाटील यांनी सांगितली आठवण

वाळकी, वडगाव तांदळी (ता. नगर) येथे जिल्हा बॅंकेच्या वतीने खेळते भांडवलाचा धनादेश नुकताच देण्यात आले.
20200420_082159.jpg
20200420_082159.jpg

नगर : ``ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विचारले होते, की तू आत्ताच हेलिकाॅप्टरमधून फिरतोस, नवडून कसा येणार. हेलिकाॅप्टरमुळे माझे तिकिट त्या वेळी कापले. पण बरे झाले ते तिकिट मिळाले नाही. आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षाचा खासदार आहे. मी आनंदी आहे,`` असा खुलासा खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

वाळकी, वडगाव तांदळी (ता. नगर) येथे जिल्हा बॅंकेच्या वतीने खेळते भांडवलाचा धनादेश नुकताच देण्यात आले. या वेळी विखे पाटील बोलत होते. आमदार बबनराव पाचपुते, माजी मंत्री शिवाजी कर्डिले,बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के तसेच मान्यवर या वेळी उपस्थित होते.

काॅंग्रेसमध्ये असताना आपले तिकिट कापल्याबाबत खासदार विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून खुलासा केला. ते म्हणाले, आपले हेलिकाॅप्टर तेव्हाही होते, भविष्यातही राहणार आहे. त्या वेळी खासदारकीचे तिकट हेलिकाॅप्टरमुळे कापले गेले. त्या वेळी मी काॅंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये होतो, असे त्यांनी सांगितले.

त्यांना काम करता येत नसेल, तर आम्ही प्रश्न सोडवू

राज्यातील सरकार हे तीन पक्षाचे आहे. षडयंत्र रचून ते स्थापन झाले आहे. या सरकारला काम करता येत नसेल, तर बाजूला व्हावे, आम्ही जनतेचे प्रश्न सोडवू. आजही भाजप आमदारांच्या काळातील मंजूर कामांचे उद्घाटने ही मंडळी करीत आहेत. नगर जिल्ह्यात कोरोनासाठी केंद्राने 60 कोटी दिले. या सरकारने त्याचे काय केले ते आधी सांगावे. केंद्राकडून केवळ जीएसटीचे पैसे मागत आहे. आम्ही हे पैसे मिळवून देण्यासाठी मदत करतो. पण ते पैसे शेतकऱ्यांना देणार का? शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याची केंद्राची कायम भूमिका राहिली आहे. राज्याने मात्र सरकारला हवी तशी मदत केली नाही, असा आरोप डाॅ. विखे पाटील यांनी केला.

शिवाजी कर्डिले यांच्या यांचे काम मोठे

शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संकटाच्या काळात मोठी मदत केली आहे. हे त्यांचे खूप मोठे काम आहे. शेतकऱ्यांना खेळते भांडवलापोटी दिलेली कर्जाची रक्कम अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना कामे येणार आहे. कर्डिले यांनी नगर तालुक्यासाठी केलेले काम जनतेच्या स्मरणात आहे. साकळाई योजनेसाठी कर्डिले यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही जनआंदोलन उभारू, असे खासदार विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com