नगर : शहरातील तपोवण रस्त्याच्या कामात ठेकेदाराने मोठा गैरव्यवहार केल्याचे दिसून येत आहे. हा रस्ता आमच्या मुख्यमंत्र्यांच्या निधीतून होत होत आहे. त्यामुळे तो दर्जेदार झालाच पाहिजे. जनतेच्या पैशाची लूट होत असेल, तर शिवसेना खपवून घेणार नाही, असा इशारा शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांनी दिला आहे.
रस्त्याच्या दर्जाची तपासणी करण्यासाठी वरिष्ठ गुणवत्ता निरिक्षक संतोष चौधरी (नागपूर) यांनी काल तपोवन रस्त्याची पाहणी करून दर्जाची, वापरलेल्या डांबराची, खडीकरणाची तपासणी राठोड यांच्या समवेत केली. रस्त्याची झालेली दूरवस्था दाखवताना संतप्त झालेले राठोड यांनी या वेळी अधिकारींना चांगलेच धारेवर धरले. या वेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे, दिगंबर ढवण, गिरीश जाधव, उपशहर प्रमुख डॉ. चंद्रकांत बारस्कर तसेच अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी खड्डे खोदून आतील कामाची पाहणी केली. हा रस्ता अनेक ठिकाणी पहिल्याच पावसाने वाहून गेला आहे. त्यावरील डांबर निघत आहे, या बाबी पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
नगर शहराच्या उपनगरातील तपोवण या रस्त्यासाठी मुख्यमंत्री निधीतून 3.5 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. हा रस्ता भव्य-दिव्य व्हावा, अशी अपेक्षा राठोड यांनी व्यक्त केली. तथापि, ठेकेदाराकडून जुजबी काम होत असल्याची तक्रार करून राठोड यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ते म्हणाले, संबंधित ठेकेदाराने कामात मोठा गैरव्यवहार करून जनतेच्या पैश्याची लुट चालवली आहे. जनतेच्या पैश्याची लुट शिवसेना कदापि खपवून घेणार नाही. जोपर्यंत हा तपोवन रस्ता पूर्ण उखडून पुन्हा काम सुरू करीत नाहीत, तोपर्यंत शिवसेना शांत न बसता अनेकदा आंदोलने करणार आहे. शिवसेनेच्या तक्रारीची दखल घेत पुणे येथील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या कार्यालयाने या कामाची चौकशी व दर्जाची तपासणी करण्यास सुरु केली आहे. या रस्त्याजवळील नागरिक आपल्याकडे कायम तक्रारी करीत असून, या भागातील शिवसनेचे दिगंबर ढवन या रत्याच्या कामावर बारीक लक्ष ठेऊन आहेत. शहराचे वैभव वाढवणारा हा रस्ता जर अशा पद्धतीने खालच्या दर्जाचा झाला, तर शिवसेना या कामचा विरोध करत आहे. राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री बसलेले आहेत. त्यामुळे अधिकारींनी कोणाच्या ही दाबावाला बळी न पडता या झेलेल्या निकृष्ट कामाची तपासणी करावी. या संदर्भात मी मुख्यमंत्रींकडे पत्रव्यवहार करत आहे. नागपूरहून आलेले वरिष्ठ गुणवत्ता निरिक्षक संतोष चौधरी यांनी २० जुलै पर्यंत या कामाची संपूर्ण तपासणी करणार आहोत व अहवाल वर पाठवणार आहोत, असे या वेळी सांगितले.

