महिला इरेला पेटल्या ! त्या निर्णयाचा बदला घेण्यासाठी स्वतंत्र पॅनल

पारनेर तालुक्यात बहुतांश ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तालुक्याचे लक्ष लागलेल्या निघोज ग्रामपंचायतीची निवडणूकही होत आहे.
sarpanch.png
sarpanch.png

निघोज : महिलांनी गावात दारूबंदी केली होती. तथापि, पुढाऱ्यांनी ती उठविल्याने त्या संतप्त होत्या. आता ग्रामपंचायत निवडणुकीत या महिला उतरणार आहेत. स्वतंत्र पॅनल उभे करून संबंधित पुढाऱ्यांना धडा शिकविण्याचा निर्णय दारूबंदी चळवळीतील महिलांनी घेतला आहे.

पारनेर तालुक्‍यात बहुतांश ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तालुक्याचे लक्ष लागलेल्या निघोज ग्रामपंचायतीची निवडणूकही होत आहे. त्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. दरम्यान, ऑगस्टमध्ये गावातील महिलांनी एकत्र येऊन गावात दारूबंदीचा लढा जिंकला होता.

निघोजच्या या महिलांचे जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात राज्यभरातून कौतुक झाले. मोठ्या गावामध्येही दारूबंदी होऊ शकते, हे येथील महिलांनी दाखवून दिले होते. मात्र, अवघ्या तीन वर्षांत पुढाऱ्यांनी ग्रामपंचायतीचा ठराव देऊन दारूबंदी उठविल्याने गावातील अनेक महिला नाराज झाल्या. त्यांनी आता या पुढाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

महिलांचे स्वतंत्र पॅनल उभे करून पुन्हा ताकद दाखविण्यासाठी त्या सरसावल्या आहेत. त्यामुळे गावातील पुढारी व महिलांमध्ये या निवडणुकीत संघर्ष पाहायला मिळेल. निघोज ग्रामपंचायतीची निवडणूक यंदाही जिल्ह्यात गाजण्याची चिन्हे आहेत.

"त्या' प्रकाराचा बदला घेणार

महिलांनी एकजूट करून गावात दारूबंदी केली असताना, गावातील पुढाऱ्यांनी ठराव करून ती उठविली. त्यामुळे गावातील महिलांचा एक प्रकारे अपमान झाला आहे. त्याचा बदला घेण्यासाठी आम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे, असे दारुबंदी चळवळीतील कार्यकर्त्या कांता लंके यांनी सांगितले.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com