पारनेरचा पाणीप्रश्न सोडविण्याचे मुख्यमंत्र्यांचे पक्के आश्वासन मिळाल्याने माघार - Withdrawal after receiving firm assurance to solve Parner's water problem | Politics Marathi News - Sarkarnama

पारनेरचा पाणीप्रश्न सोडविण्याचे मुख्यमंत्र्यांचे पक्के आश्वासन मिळाल्याने माघार

मार्तंड बुचुडे
बुधवार, 8 जुलै 2020

शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर व आमदार निलेश लंके हे सोडवतील. तुमच्या स्थानिक अडचणी माला समजल्या आहेत. आता आघाडीत बिघाडी झाल्याचा वेगळा संदेश राज्यात जाऊ नये म्हणून तुम्ही शिवसेनतच थांबावे, असे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पारनेर : पारनेरच्या पाणी पुरवठा योजणेचा प्रस्ताव पाठवा, त्यास तात्काळ मंजूरी देऊ, तसेच तुम्हाला काही अडचणी आल्या किंवा काही प्रश्न निर्माण झाले, तर शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर व आमदार निलेश लंके हे सोडवतील. तुमच्या स्थानिक अडचणी माला समजल्या आहेत. आता आघाडीत बिघाडी झाल्याचा वेगळा संदेश राज्यात जाऊ नये म्हणून तुम्ही शिवसेनतच थांबावे, असे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी सांगितल्यामुळे आम्ही आमचा निर्णय बदलत शिवसेनतच थांबण्याचा निर्णय घेतल्याचे त्या पाच नगरसेवकांपैकी नंदकुमार देशमुख यांनी `सरकारनामा`शी   बोलताना सांगितले. त्यामुळे गेली पाच दिवस पक्षांतराचे चाललेल्या राजकिय नाट्यावर पडदा पडला आहे.

आज दुपारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे, आमदार निलेश लंके, मिलिंद नार्वेकर यांच्यासह पाच नगरसेवकांची बैठक झाली, या बैठकीत या पाचही नगरसेवकांनी पुन्हा शिवसेनेत थांबावे असे ठरले. शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी नुकताच बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार नितेश लंके यांच्या मध्यस्थीने व उपस्थितीत प्रवेश केला होता. त्यावरून पारनेर तालुक्यातील नव्हे, तर राज्यातील राजकारण तापले होते. राज्यात या पक्षाची आघाडी असतानाही अशी फोडाफोडी करणे योग्य नाही. मात्र हा स्थानिक पातळीवरील विषय आहे. असे सांगून संजय राऊत यांनी सारवासारव केली होती.

आज सकाळीच पारनेरचे पक्षांतर केलेले हे पाचही नगरसेवक व आमदार लंके यांनी मुंबई गाठली व तेथे मुख्यमंत्री ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. सुमारे एका तास या वेळी चर्चा झाली. मातोश्रीवरील बैठकीपूर्वी मंत्रालयात अजितदादा पवार, मिलिंद नार्वेकर आमदार लंके यांच्या उपस्थितीत प्रथम या पाच नगरसेवकांची प्राथमिक चर्चा झाली होती. या बैठकीस तालुका महिला आघाडी प्रमुख उमा बोरुडे, विजय वाघमारे, विजय औटी, आनंदा औटी, साहेबराव देशमाने, जितेश सरडे आदी उपस्थित होते.

आघाडी सरकारवर परिणाम होऊ नये व राज्यात आगाडी सरकारविषयी वेगळे संदेश जाऊ नये, तसेच शहराचा पाणीप्रश्न तात्काळ सोडविण्याचे अश्वासन मिळाल्याने आम्ही पुन्हा शिवसेनेत परतण्यावर आमचे सर्वांचे एकमत झाले आहे. त्याचबरोबर आमचे प्रश्न आता कोरेगावकर व लंके सोडविणारा आहेत, हे दोघे या दोन्ही पक्षात समन्वय साधणार आहेत. त्यामुळे आमच्यात झालेली कटुता मिटविण्यात आमदार लंके यांनी यशस्वी मध्यस्ती करत या पाच ही नगरसेवकांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत पाठीमागे परतण्यास संमती दिली आहे.

मिलिंद नार्वेकर, आमदार नीलेश लंके ठेवणार नाराज नगरसेवकांशी या पुढील काळात समन्वय ठेवणार असून, पुन्हा त्यांच्यात नाराजी होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असेही या बैठकित ठरल्याचे देशमुख यांनी सांगितले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख