नगर : जिल्ह्यातील खासगी रुग्णालये व कोविड सेंटर सध्या हाऊसफुल आहेत. जिल्ह्यात सध्या 4 हजार 435 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. रोज 800 ते 900 रुग्ण वाढत असून, तितकेच डिस्चार्ज होत आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांना `बेड मिळेल का बेड` असे म्हणण्याची वेळ येत आहे.
जिल्ह्यात काल ६४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४ हजार ७६९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.२३ टक्के इतके झाले आहे. काल दिवसभरात रूग्ण संख्येत ७७८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ४३५ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १३१, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २९० आणि अँटीजेन चाचणीत ३५७ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७०, संगमनेर १, राहाता ७, पाथर्डी १, श्रीरामपूर २०, कॅंटोन्मेंट ५, नेवासे ८, श्रीगोंदा ९, पारनेर २, राहुरी २, कोपरगाव १, जामखेड ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २९० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १०७, संगमनेर ४, राहाता ७, पाथर्डी ४, नगर ग्रामीण ७, श्रीरामपुर ३७, कॅंटोन्मेंट १४, नेवासा १०, श्रीगोंदे ७, पारनेर १७, अकोले ३१, राहुरी ९, शेवगाव १३, कोपरगाव १२, जामखेड १० आणि कर्जत १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत ३५७ जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा २४, संगमनेर १६, राहाता २८, पाथर्डी १३, नगर ग्रामीण २०, श्रीरामपूर ९, कॅंटोन्मेंट २१, नेवासा १०, श्रीगोंदा २३, पारनेर ५२, अकोले २३, राहुरी ३२, शेवगाव ३६, कोपरगाव २५, जामखेड २४ आणि कर्जत १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
सध्या जिल्ह्यात बरे झालेल्यांची संख्या 34 हजार 769 असून, आतापर्यंत 656 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तसेच आतापर्यंत 39 हजार 860 रुग्णांची नोंद झाली आहे.

